Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : पार्टटाईम जॉबच्या आमिषाने तिघांना ३४ लाखांचा गंडा

Nashik Crime : पार्टटाईम जॉबच्या आमिषाने तिघांना ३४ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पार्टटाईम जॉब (Part Time Job) देण्याचे सांगत तरुण वर्गाला विविध टेक्निकल टास्क पूर्ण करण्यास सांगत सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तिघांकडून ३४ लाख रुपये उकळले आहेत. टास्क देतानाच त्यासाठी पैसे उकळून व टास्कचे जमा झालेले व्हर्चुअल पैसे विड्रॉल करण्यासाठी अधिकचे पैसे (Money) खात्यांत वर्ग करण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik City Cyber ​​Police Station) विविध ट्विटर हॅन्डल, बँक वॉलेट वापरकर्त्या संशयितांवर आयटी अँक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. एका तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, त्याला व इतर दोघांना संशयितांनी ५ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध व्हॉट्सअॅप नंबर, टेलिग्राम व ट्विटरवरुन संपर्क साधला. यावेळी व्हॉट्सअप क्रमांकावरून ऑनलाईन पार्टटाईम जॉबबाबत मॅसेज पाठविले.

दरम्यान, यासह सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील टेलिग्रामवरील विविध ट्विटर अकाऊंटवरुन चॅटींग करत वेळोवेळी टास्कची ऑर्डर पूर्ण करण्यास भाग पाडले. यास्तव तक्रारदाराकडून, ११ लाख ६८ हजार रुपये विविध यूपीआय खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. तर, अशाच पद्धतीने अन्य दुसऱ्या तक्रारदाराकडूनही अनुक्रमे १५ लाख ६१ हजार तर, तिसऱ्या तक्रारदाराकडून ६ लाख ७२ हजार रुपये असे एकूण ३४ लाख दोन हजार रुपये ट्रान्स्फर करुन घेत आर्थिक फसवणूक केली. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...