Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : तीन घरफोड्यांमध्ये दहा लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime News : तीन घरफोड्यांमध्ये दहा लाखांचा ऐवज लंपास

नाशिक | Nashik

अशोकनगर येथील टेक्सस्टाईल्स दुकानाच्या गल्ल्यातून साडेसात लाखांची रोकड, नाशिकरोडला (Nashik Road) बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वा दोन लाख तर सिडकोतील घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी (Thieves) ३४ हजार असा तीन घरफोड्यांमध्ये सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर, अंबड व नाशिकरोड पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : लोकअदालतीत १ हजार प्रकरणे निकाली; ५७ कुटुंबांतील वाद मिटला

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष जगदीश भट्टड (रा.चंद्रलीला बंगला, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे अशोकनगर (Ashok Nagar) येथे प्रगती टेक्सस्टाईल्स मार्केट हे कपड्याचे दुकान आहे. रविवारी (दि. २९) पहाटे दोनच्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश केला आणि त्याने गल्ल्याच्या ड्राव्हरमध्ये घरपट्टी भरण्यासाठी ठेवलेले ७ लाख ५० हजारांची रोकड चोरून नेली. सातपूर पोलिसात (Satpur Police) घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक रोहीत गांगुर्डे हे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : Political Special : ‘शिवस्वराज्य यात्रा’ कोणत्या उमेदवाराला पावणार?

तर दुसरी घरफोडी नाशिकरोड हद्दीतील शिंदेगाव (Shindegaon) येथे झाली. रवी संतू पाळदे (रा. शिंदेगाव) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २८) सकाळी साडेआठ ते रात्री दहा यादरम्यान चोरट्यांनी पाळदे यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून २ लाख २२ हजारांच्या दागिन्यांसह (Jewelry)रोकड चोरून नेली. नाशिकरोड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिसरी घरफोडी, सिडकोतील वृंदावन चौकातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. स्नेहल महेश सोनजे (रा. वृंदावन चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, २० तारखेला मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. यात चोरट्यांनी ३४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...