Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : टीईटी परीक्षार्थीना चोरट्यांचा हिसका; दुचाकींच्या डिक्कीतून मोबाईल, एटीएम कार्ड,...

Nashik Crime : टीईटी परीक्षार्थीना चोरट्यांचा हिसका; दुचाकींच्या डिक्कीतून मोबाईल, एटीएम कार्ड, पैसे लांबवले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीईटी (TET) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा देणे काही विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडले आहे. परीक्षा केंद्रावर (Exam Centre) पेपर सोडवण्यात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांचे (Student) मोबाईल, बॅग, पाकीट व एटीएम कार्ड चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार म्हसरूळ हद्दीतील केंद्रावर घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

परीक्षा नियंत्रण मंडळाने कॉपी टाळण्यासाठी परीक्षार्थीना केंद्रात मोबाईल, पैसे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य नेण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे त्यांनी मोबाईल (Mobile) एटीएम कार्ड, रक्कम आपापल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. तेव्हा हीच संधी साधून चोरट्यांनी ही हातसफाई केली.  शुभम अनिल पगार (रा. शिर्डी, ता. राहाता) या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. या घटनेत पगार यांच्या पाकिटातील साडेतीन हजारांची रोकड तसेच एटीएम कार्ड असा ऐवज भामट्यांनी लांबवला.

YouTube video player

तर विजय बागुल आणि प्रिया पात्रा या विद्यार्थ्यांच्या दुचाकीतील डिक्कीत ठेवलेली रोकड आणि मोबाईल असा सुमारे ९१,४५० रुपये किमतीचा ऐवज लांबवला. दरम्यान, परीक्षास्थळावर चोरट्यांनी धुमाकूळ घालून विद्यार्थ्यांच्या बॅगेतील रोकडसह मोबाईलवर डल्ला मारल्याने अनेकांना घरी परतण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे पीडित विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका करून संताप व्यक्त केला.

एटीएम कार्ड स्वॅप करून गंडा

पगार यांच्या पाकिटातील डेबीट कार्डचा गैरवापर करून चोरट्यांनी बँक खात्यातील ५१,६५० रुपये परस्पर काढून घेतले. चोरट्यांनी एटीएम नंबर, सीव्हीव्ही व ओटीपीच्या माध्यमातून ही रक्कम लांबवली.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...