Monday, February 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : किन्नरांमध्ये 'गुरु'वरून गटयुद्ध! वसूली, धर्मांतरण, खंडणीप्रकरणी शहरात तीन गुन्हे

Nashik Crime : किन्नरांमध्ये ‘गुरु’वरून गटयुद्ध! वसूली, धर्मांतरण, खंडणीप्रकरणी शहरात तीन गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी

वर्चस्व, ‘गुरुआज्ञा’, कमाईतील हिस्सा आणि धर्मांतरणाच्या आरोपांवरून नाशिकच्या तृतीयपंथीय (किन्नर) समुदायात (Transgenders Community) उघड गटयुद्ध भडकले आहे. अवघ्या पंधरा दिवसांत आडगाव, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांत गंभीर कलमांन्वये तीन स्वतंत्र गुन्हे (Case) दाखल झाल्याने समुदायातील अंतर्गत संघर्ष रस्त्यावर आला आहे. आर्थिक वादाला धार्मिक रंग चढल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठीही हे आव्हान ठरणार आहे.

- Advertisement -

भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) फिर्यादी देविका राजेंद्र सोळसे (वय २८, रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हिच्या फिर्यादीनुसार, ती तृतीयपंथी असून, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी कथडा येथील डाॅ. झाकीर हुसैन हॉस्पिटलजवळील डॉ. आंबेडकर उद्यानासमोर तिला संशयित गुरु सलमा उर्फ सलीम, सोनाली उर्फ रोहन आणि सारिका उर्फ सुनील यांनी बाेलावून घेतले. ‘तुझ्या  कमाईतील २० हजार रुपये दरमहा दे’ अशी मागणी करीत मारहाण केल्याचा आराेप तिने केला आहे. नकार देताच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. “धर्मांतर कर, नाहीतर ठार मारू,” अशा धमक्या देत धार्मिक दबाव आणल्याचा आरोपही तक्रारीत आहे.

YouTube video player

तसेच, हिंदी भाषेतून अश्लिल संवाद साधत तिच्या पाठीवरील टॅटूच्या गोंदणावर संशयितांनी चप्पलने मारहाण करुन ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली, असे नमूद केले आहे. दरम्यान, किन्नरांमधील या संघर्षात याआधीही गुन्हे नाेंद आहेत. त्यानुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) शुभम अर्जुन रिकामे (वय २५, रा. गजानन चौक, पंचवटी) यांच्या फिर्यादीवरून संशयित अब्दुल जलालुद्दीन शेख (रा. कालिकानगर, मुंबई नाका) व त्याची गुरु सलमा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपये दे, नाहीतर धर्मांतर कर,” अशी मागणी केल्याचा आरोप आहे. तर आडगाव पोलिस ठाण्यात अनिकेत ऊर्फ डॉली वसंत म्हस्के (वय २१, रा. भालेराव मळा, नाशिक रोड) हिच्या तक्रारीवरून संशयित शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर शिंदे व सोनू घुगे (दोघे रा. नांदूर नाका) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. “पैसे देणे बंद केलेस, तुला व्यवसाय करू देणार नाही,” असे म्हणत दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. 

अंतर्गत ध्रुवीकरण

आर्थिक वादातून धार्मिक आरोपांपर्यंत पोहोचलेला हा संघर्ष केवळ अंतर्गत वाद न राहता सार्वजनिक पातळीवर पोहोचला आहे. ‘गुरु’च्या नावाखाली वसूली, धमक्या आणि परस्परांवरील गंभीर आरोपांनी किन्नर समुदायात अभूतपूर्व फूट पडल्याचे चित्र आहे. पुढे हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

गुरुत्व, वसूली आणि वर्चस्वाचा स्फोट

शहर व जिल्ह्यातील टोलनाके, बाजारपेठा आणि समारंभस्थळी वसूली कोण करणार? कलेक्शननंतर हिस्सा किती आणि कुणाला? गुरु कोण मानायचा?—या प्रश्नांवरून किन्नर समुदायात खोल दुभंग निर्माण झाला आहे. सलमा गुरु, शुभांगी उर्फ सागर शिंदे, सोनू घुगे, अब्दुल शेख, अनिकेत म्हस्के आदींचे स्वतंत्र गट तयार झाले आहेत. रविवारी (दि. ८) विविध गटांनी पत्रकार परिषद व बैठका घेतल्या; तर एका सागर शिंदेच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हाेता. या संघर्षानुसार, सिन्नर, भद्रकाली, आडगाव, नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यांत दहापेक्षा अधिक तक्रारी प्रलंबित असून समांतर तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : अजितदादांच्या मृत्यूनंतर मंत्रालयात फाईलवर सह्यांचा धडाका; आता ...

0
मुंबई | Mumbai राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात...