नाशिक | Nashik
पाथर्डी फाटा परिसरातील (Pathrdi Phata Area) पार्कसाईट येथे मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाच्या (Youth) डोक्यात हॉकी स्टीकने टाकून जीवे ठार (Killed) मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरी घटना देवळाली गावात घडली असून, संशयितांनी दोघा भावांवर कोयत्याने वार करुन जीवघेणा हल्ला केला.
हे देखील वाचा : Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार
याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष दलोड, सिद्धार्थ सुरेश दलोड, सिद्धांत सुरेश दलोड, सनी हटवाल (सर्व रा. महालक्ष्मी चाळ, द्वारका) अशी संशयितांची नावे आहेत. तर सम्राट चंद्रशेखर गायकवाड (रा. पार्कसाईड, पाथर्डी फाटा) असे जखमी युवकाचे नाव आहे. निखिल कैलास निकाळे (रा. आम्रछाया कॉलनी, खुटवडनगर) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.८) रात्री त्यांचा साला सम्राट यास भेटण्यासाठी पार्कसाईट येथे गेले.
हे देखील वाचा : Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे मंत्री भुसेंच्या हस्ते लोकार्पण
यानंतर ते पार्किंगमध्येच असताना संशयित (Suspect) आले आणि त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढली.त्यावरून शिवीगाळ करीत सम्राट यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्याच्याकडील हॉकी स्टीकने सम्राटच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात (Indiranagar Police) संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशकात थायलंडच्या गांजाची विक्री; एनडीपीएस पथकाची कारवाई
तर, दुसऱ्या घटनेत संशयित राहुल सुरेश निकम (२७), कृष्णा उर्फ किशोर सुरेश निकम (२४, रा. गांधी धाम, मनपा वसाहत, देवळाली गाव) अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, दीपक राजाराम पगार (रा. अण्णा भाऊ साठेनगर, देवळालीगाव) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. ८) संशयितांनी जुन्या भांडणांची कुरापत काढून दीपक व त्याचा भाऊ गणेश या दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करीत धमकावले. तसेच, धारदार कोयत्याने त्यांच्यावर हल्ला करून दीपक यांची चारचाकी गाडी घेऊन गेले. याप्रकरणी उपनगर पोलिसात (Upnagar Police) संशयितांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक भंडे हे तपास करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा