Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik Crime News : नाशकात थायलंडच्या गांजाची विक्री; एनडीपीएस पथकाची कारवाई

Nashik Crime News : नाशकात थायलंडच्या गांजाची विक्री; एनडीपीएस पथकाची कारवाई

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक | Nashik

थायलंडमध्ये पिकविलेला गाजा चक्क नाशकात नशेसाठी चढ्यादराने विक्री होत असल्याचे नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) एनडीपीएस पथकाच्या कारवाईतून समोर आले आहे. शहरातील काही व्यावसायिक थायलंडच्या गांजाची (Ganja) नशा करीत असल्याचे तपासात समोर आले असून थायलंड येथून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या दोन लाख रुपयांच्या गांजासह पोलिसांनी दोघांना अटक (Arrested) केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे मंत्री भुसेंच्या हस्ते लोकार्पण

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘एनडीपीएस’ने (NDPS) विशाल वसंत बावा गोसावी (वय २५, रा. शिवशक्ती चौक) याच्यासह आणखी एका संशयिताला अटक केली आहे. या दोघांना ६८६ ग्रॅम वजनाच्या परदेशी गांजासह अटक केली. या दोघांविरुद्ध अंबड पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी पथकास सूचना दिल्या होत्या.त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी पथकाला सापळा रचण्यास सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार

दरम्यान, यानंतर सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, बळवंत कोल्हे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, भारत डंबाळे यांनी त्रिमूर्ती चौक, शिवशक्तीनगर परिसरात संशयितांचा माग काढला. त्यानुसार दोन्ही संशयितांना (Suspect) ताब्यात घेत झडती घेतल्यावर गांजा मिळाला. तर गोसावी हा सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान, परदेशातील गांजा नाशिकमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. त्यामुळे ‘एनडीपीएस’ने त्यासंदर्भातील सखोल तपासाला सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?

स्थानिक गांजा २० रुपयांचा एक ग्रॅम

१) गांजाची ही वाहतूक कोणामार्फत सुरू होती याचा शोध सुरू
२) थायलंडमध्ये गांजाची सर्रास विक्री
३) थायलंडमधून काही महिन्यांपूर्वी गांजा पोहोचला
४) संशयितांनी नाशिकच्या काही व्यावसायिकांना विक्री केला
५) थायलंडचा गांजा ३२६ रुपयांचा एक ग्रॅम

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या