Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : बोगस शिक्षक भरती प्रकरण : शिक्षणाधिकारी प्रवीण पाटीलसह तिघांना...

Nashik Crime : बोगस शिक्षक भरती प्रकरण : शिक्षणाधिकारी प्रवीण पाटीलसह तिघांना कोठडी

उपशिक्षणाधिकारी देवरे, कार्यालय अधीक्षक पगार यांचा समावेश

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

मालेगाव तालुक्यात (Malegaon Taluka) बाेगस शिक्षक व लिपिक भरतीसह तीन काेटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याच्या दाखल गुन्ह्यात नाशिक ग्रामीणच्या (Nashik Rural) आर्थिक गुन्हेशाखेने(इओडब्ल्यू) नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील (वय ५०), कार्यालय अधीक्षक सुधीर भास्कर पगार आणि उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठल देवरे (५२) यांना अखेर मंगळवाराी(दि. ९) अटक केली आहे. त्यांना मालेगाव येथील न्यायालयाने बुधवारी -दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागात हा गैैरव्यवहार झाल्याची ओरड हाेताच खळबळ उडाली हाेती. आता थेट वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाच अटक झाल्याने या प्रकरणात सहभागी संशयितांसह गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे.

- Advertisement -

जुलै २०२५ मध्ये पवारवाडी पोलीस ठाण्यात (Pawar Wadi Police Station) दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन मालेगाव हायस्कूलमधील मुदतबाह्य शिक्षक भरती प्रकरणात प्रवीण पाटील आणि कार्यालय अधीक्षक सुधीर पवार यांना अटक केली आहे, तर, य. ना. जाधव शिक्षण संस्थेच्या शिक्षक भरती घोटाळ्यात उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांना अटक करण्यात आली. सेवाजेष्ठता डावलून तेरा शिक्षकांना मान्यता आणि वेतन अदा केल्याप्रकरणी प्रवीण पाटील व सुधीर पगार या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.दरम्यान, मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संस्थाचालकांसह चार संशयित एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा नोंद झाल्यापासून पसार आहेत.

YouTube video player

दरम्यान, याप्रकरणात कर्मचारी भरतीला मान्यता देणाऱ्या जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपअधीक्षक जे. एम. करंदीकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही गुन्हे मिळून कोट्यवधी रुपयांची फसवणूक व अपहार असल्याने प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. त्यानुसार, पाेलिसांच्या जाळ्यात सर्वच छाेटेमाेठे मासे अडकले जाण्याची शक्यता आहे.

असे आहे पहिले प्रकरण

मालेगाव हायस्कूलचे उपशिक्षक जैनब मोहंमद यांच्या फिर्यादीन्वये संस्थाध्यक्ष संशयित मोहम्मद इस्हाक खलील अहमद, प्राचार्य जाहीद हुसैन मोहम्मद अली, लिपिक नासीर हुसैन मोहम्मद अली, अबू हुरैर, एजंट नवीन अख्तर सगीर अहमद या पाच संशयितांवर पवारवाडीत गुन्हा नोंद आहे. जैनब हे १७ जून २०१३ पासून विनाअनुदानीत कर्तव्यावर कार्यरत आहेत. संशयितांनी संगनमताने त्यांच्यासह काही शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून जून २०२४ मध्ये इतर तेरा उपशिक्षकांच्या नावे सन २०१२ ते २०२१ या कालावधीचे कर्तव्यावर असल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र तयार केले. ते संचमान्यतेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवून २ कोटी ६९ लाख ५६ हजार रुपयांचे थकीत वेतन मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुसरे प्रकरण

माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मालेगावातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर यादवराव नारायण जाधव विद्यालयाचे अध्यक्ष संशयित सुनिल माधव वडगे, सचिव जिभाऊ रघुनाथ आहिरे, मुख्याध्यापक नंदलाल भिमाजी ताजणे, वरिष्ठ लिपिक संदीप विश्वानाथ जाधव यांच्याविरुद्ध मालेगाव छावणी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. संस्थेला सन २०१२ मध्ये चार कनिष्ठ लिपिक पदे मंजूर झाली. त्यापैकी दोन पदे कार्यरत होती तर दोन नव्याने निर्माण झाली. संशयितांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सहापैकी दोन आरक्षित पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. मुख्याध्यापकांनी जाधवला सन २०१२ मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिली. २५ मार्च २०१२ रोजीच्या ठरावासह आरक्षण पुस्तिकेतही त्याचे नाव नाही. जाधव हा संस्थेच्या विश्वस्तांचा मुलगा असून, बनावट कागदपत्रे तयार करुन त्याला दिलेल्या वेतनातून ४५ लाखांची फसवणूक केली असे नमूद आहे.

संशयितांचे बँक खाते, कार्यालयीन दस्तऐवजांसह संशयास्पद व्यवहारांची तपासणी सुरु आहे. संशयितांबाबत या प्रकरणांसह इतर तक्रारी असल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी अर्ज द्यावेत. सखाेल तपास केला जाईल.

राजू सुर्वे, वरिष्ठ निरीक्षक, आर्थिक गुन्हे, नाशिक ग्रामीण

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...