नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २० गुन्हेगारांना नाशिक शहरासह जिल्ह्यातून (Nashik City and District) हद्दपार करण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकरोडच्या आठ, सातपूर पाच, अंबड चार, उपनगर दोन व देवळाली कॅम्पमधील एका गुन्हेगाराचा समावेश आहे. यापुढेही प्रतिबंधात्मक कारवाया वाढविल्या जातील, असे झोन दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Crime : ईव्हीएम हॅक करुन देण्याची बतावणी करणारा अटकेत
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये उपायुक्त मोनिका राऊत यांनी सहायक आयुक्त शेखर देशमुख व डॉ. सचिन बारी यांना सराईत गुन्हेगारांची यादी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सातपूर, अंबड, इंदिरानगर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयितांसह गुन्हेगारांची माहिती पथकांनी संकलित केली. संशयितांविरुद्ध दोन्ही सहायक आयुक्तांनी तडीपारीची कारवाई (Action) करुन उपायुक्तांना अहवाल सादर केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ
या सराईतांना नाशकात बंदी
नाशिकरोड : लहू बबलू काळे (२०, रा. पळसे), दीपक दिनेश फाजगे (३२, रा. देवळाली गाव), निरंक उर्फ नाऱ्या उर्फ नरेश नागो नरोटे (२२, रा. अरिंगळे मळा), शरिष सुनील कांबळे (२४, रा. गोरेवाडी), गौरव उर्फ सोनू सुभाष भागवत (२०, रा. सिन्नर फाटा), नीलेश बाजीराव पेखळे (३९, रा. मोरे मळा), गणेश संजय चव्हाण (२२, रा. पवारवाडी), दाउत सादीक शेख (२०, रा. सुभाषरोड) सातपूर : रोशन भगवान भाडमुखे (२१, रा. श्रमिकनगर), प्रतीक राजेश एकडी (२४, रा. पुष्पक पार्क, श्रमिकनगर), मिलिंद पिराजी मुंढे (२१, रा. सातपूर), कल्पेश दीपक वाघ (२६, रा. शिवाजीनगर), सौरव राजेंद्र खरात (२१, रा. स्वारबाबा नगर) अंबड : गणेश बबन कुहे (२९, रा. मोरवाडी), वैभव गजानन शिर्के (२३, रा. कामटवाडे), नागेश भागवत सोनवणे (३८, रा. उपेंद्रनगर), विशाल राजू देवरे (२१, रा. पंडितनगर) उपनगर पीयूष बाळू शिंदे (२०, रा. देवळाली गाव), बबलू रामधर यादव (२१, रा. सुंदरनगर, देवळाली गाव) देवळाली कॅम्प : रोहित अशोक गायकवाड (वय २५, रा. लहवित)
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा