Sunday, September 29, 2024
Homeक्राईमNashik Crime News : वीस मिनिटांत दोन चैनस्नॅचिंग; एकाच पल्सरवरील तिघांवर गुन्हा

Nashik Crime News : वीस मिनिटांत दोन चैनस्नॅचिंग; एकाच पल्सरवरील तिघांवर गुन्हा

पसार झाल्यावर शोध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन सिडकोतील उत्तमनगरच्या भगवती चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पसार झालेल्या तिघा चोरट्यांनी (Thieves) अवघ्या २० मिनिटात पाथर्डी फाटा येथे पुन्हा एका महिलेच्या (Woman) गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलिसात (Police) जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन्ही गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी एकच असून, तिघे संशयित होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : तोतया पोलीस बनून लूट करणाऱ्या बंटी-बबलीचा पर्दाफाश; बंटी ताब्यात, बबली फरार

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना वसंत खैरनार (५३, रा. सर्वेश्वर चौक, उत्तमनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.. २८) सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्या भगवती चौकातील अमोल ॲलर्ससमोर त्यांची मैत्रिण अनिता सोनवणे व सून भाग्यश्री सोनवणे यांच्याशी गप्पा मारत थांबल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून (Bike) तिघे संशयित आले.यातील एकाने त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून विजयनगरच्या दिशेने पोबारा केला. अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक रौंदळे हे तपास करीत आहेत. तर सिडकोतून पोबारा केलेल्या संशयितांनी अवघ्या २० मिनिटांमध्ये दुसरी चैनस्नॅचिंग केली.

हे देखील वाचा : मारहाणीत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

तसेच सुनिता लिलाधर अत्तरदे (५५, रा. आर.के. लॉन्सजवळ, नवलेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारा त्या किराणा दुकानातून परत घराकडे (Home) येत असताना कृष्णकुंज बंगल्याच्या कॉर्नरजवळ होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात (Indiranagar Police) गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक चौधरी हे तपास करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या