Sunday, June 8, 2025
Homeक्राईमNashik Crime : प्रवाशाला लुटणारा रिक्षाचालक गजाआड; युनिट एकची कारवाई, सव्वा लाखांचा...

Nashik Crime : प्रवाशाला लुटणारा रिक्षाचालक गजाआड; युनिट एकची कारवाई, सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

कॅनडाहून (Canda) भारतात (India) आलेल्या प्रवाशास लॉज शोधून देण्याच्या बहाण्याने मद्य पाजून एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) प्रवाशाकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल हिसकावून नेल्याची घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रिक्षाचालकास अटक केली आहे. जगदीश दादाजी कापडणीस (४२, रा. संगमेश्वर, ता. मालेगाव, सध्या रा. कानडे हनुमान मंदिराजवळ) असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे.

प्रदीप गिते (रा कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते कॅनडाहून आल्यानंतर मद्यसेवन केले व लॉज शोधत होते. त्यावेळी एमएच १५ ईएच ७२७२ क्रमांकाच्या रिक्षाचालकाने गिते यांना लॉज शोधण्यास मदत केली. त्यानंतर दारु पिण्याचा दोघांनी निर्णय घेतला. त्यावेळी रिक्षाचालक कापडणीस याने गिते यांना जादा मद्य पाजत नशेत ठेवले. त्यानंतर गिते नशेत असल्याची संधी साधून त्यांच्या अंगावरील ५ तोळे वजनाचे सोन्याचे (Gold) दागिने व मोबाइल असा १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तपास करीत होते. पथकातील अंमलदार आप्पा पानवळ व राम बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा कापडनीस याने केल्याचे उघडकीस आले. तसेच तो शिर्डीवरून (Shirdi) नाशिकला येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, रमेश कोळी, मुक्तार शेख आदींच्या पथकाने पांगरी गाव येथून कापडणीस यास पकडले. त्याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाइल असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) जप्त केला आहे. कापडणीसचा ताबा उपनगर पोलिसांना देण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे'ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...