इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
नाशिकमध्ये (Nashik) चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) रोज नवे धक्कादायक खुलासे व कारनामे समोर येत आहे. असे असताना आता इगतपुरीतही अंधश्रध्देच्या नावाखाली फसवणुकीतून (Fraud) महिलेला ५५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन महिलांसह जडीबुटी, गंडेदोरे आदी साहित्य विकणाऱ्या दोन जणांना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी अटक केली आहे.
शहरातील तळेगाव शिवारातील (Talegaon Area) दोन महिलांनी पिडीत महिलेला जादुटोणा व तंत्र मंत्र याबाबत माहिती सांगून नातेवाईकांनी तुझ्यावर करणी केली असून तुला बाधा झाली आहे. तुला बरे करण्यासाठी पूजाविधी केली नाही तर तुझे बरेवाईट होईल. अशी भीती घालून पूजाविधीच्या नावाखाली तळेगाव येथील दोन महिलांनी ५५ हजार रुपये पिडीत महिलेकडून घेतले. कोणतीही पुजा आणि तंत्र मंत्र न करता तिला रत्नखडे दिले होते. पंरतु, अनेक दिवसांनी महिलेला या रत्न खड्याचा लाभ झाला नाही व आपली फसवणूक झाली असे तिच्या लक्षात आले.
हे देखील वाचा : Nashik APMC News : नाशिक बाजार समितीत गुंडांचा हैदोस; सभापतींसह संचालक आक्रमक
यानंतर तिने दोन महिलांना (Woman) मोबाइलद्वारे फोन करत पूजा करून आणि रत्न खडे यांमधून कोणताही फरक मला पडला नसल्याने माझे पैसे परत द्यावे अशी मागणी केली. मात्र फिर्यादी महिलेला या दोन्ही महिलेने शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली. तु कोणत्याही भक्तांकडे जा तुला कोणीही बरे करणार नाही. माझ्या नादी लागली तर तुझे पूर्ण शरीर सडून टाकील अशी धमकी दिली.
या घटनेचे गांभीर्य बघत पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव पुढील तपास करत असून, संशयित महिला आरोपी वैशाली किशोर बैरागी व रत्ना माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला व किशोर काशिनाथ बैरागी व राहुल आसाराम पाटील रा. अष्टविनायक अपार्टमेंट, तळेगाव रोड यांच्याकडे चौकशी केली असता जादूटोण्यात वापरण्यात येणारी जडीबुटी, गंडेदोरे, माळा आदी तत्सम साहित्य शेजारी राहणारे मयूर धनशाम भराडे यांच्या घरात ठेवण्यात आल्याचे सांगितले.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने आर्थिक व तांत्रिक पाठबळ द्यावे – मंत्री भुजबळ
दरम्यान, सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यात (Crime) वापरण्यात येणारे जादूटोणा व पुजा विधीचे साहित्य जप्त करून सर्वांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजणे, उपनिरीक्षक अमोल गायधनी, गोपनीय पोलीस हवालदार निलेश देवराज, दिपक मोरे, विजय रुद्रे, महेंद्र गवळी आदी करीत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ पसरली असून अंधश्रध्देच्या नावाखाली चालविण्यात येणारे अनेक बाबा-बुवांचे धाबे दणाणले आहेत.




