नाशिक | प्रतिनिधी Nashik
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्या नंतर आज राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं, उर्जा खाते असणार आहे, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, आणि सार्वजनिक बांधकाम तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातंअसणार आहे तर नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रीपद देण्यात आले आहे.
दादा भुसे –
मालेगाव बाह्य मतदार संघातून सलग चार वेळेस निवडणून आलेले शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्री पद देण्यात आले आहे. या पहिले महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
माणिकराव कोकाटे
सिन्नर विधान सभा मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. आमदार माणिकराव कोकाटे यांचे कडे कृषी मंत्री पद देण्यात आले आहे.
नरहरी झिरवाळ
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली होती.नरहरी झिरवाळ यांना अन्न औषध व प्रशासन खात्याचे मंत्री पद देण्यात आले आहे.