Friday, October 2, 2026
HomeनाशिकNashik News: नाशिकमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार; कार थेट गोदावरी पात्रात घुसवली!

Nashik News: नाशिकमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार; कार थेट गोदावरी पात्रात घुसवली!

पंचवटी | प्रतिनिधी
नाशिकमधील पंचवटी परिसरात एका मद्यधुंद कार चालकाचा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला. टाळकुटेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात या चालकाने आपली चारचाकी गाडी थेट गोदावरीच्या पात्राच्या आत घुसवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Onion Issue: कांदा प्रश्न पेटला; चांदवडला कांदा उत्पादकांचा महामोर्चा, नेमक्या मागण्या काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २६) ही घटना घडली. चालक प्रचंड मद्याच्या नशेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीपात्रात जाऊन कोसळली. सुदैवाने पाण्याचा अंदाज आल्याने आणि आजूबाजूला नागरिक असल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून मद्यपी चालकावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदीपात्र परिसरात भाविक आणि नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, अपघात झाला त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....