Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकशिक्षणाधिकारी लाच प्रकरण : आठ तास चौकशी; न्यायालयात करणार आज हजर

शिक्षणाधिकारी लाच प्रकरण : आठ तास चौकशी; न्यायालयात करणार आज हजर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या माध्यमिक शिक्षणअधिकारी डॉ वैशाली वीर-झनकर यांच्या सहकाऱ्यांना (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) काल (दि १०) ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडून रात्री तब्बल आठ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली. आज पहाटे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… (Complaint registered at bhadrakali police station)

- Advertisement -

शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे (bribe for 20 percent school grant) नियमित वेतन सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. झनकर-वीर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) ,चालक ज्ञानेश्वर येवले (Driver Dnyaneshwar Yeole) आणि शिक्षक पंकज दशपुते (Teacher Pankaj Dashpute) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाखांची लाच घेताना पकडले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी नेहमीच होत्या. कर्मचाऱ्यांमध्येही त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी होती….

दरम्यान, सूर्यास्तानंतर महिला अधिकाऱ्यास अटक करता येत नाही म्हणून झनकर यांच्या नातलगांकडे समन्स देत आज सकाळी ८ वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilla Parishad) इतिहासात पहिल्यांदाच एक खातेप्रमुख लाचलुचपतच्या जाळ्यात (ACB) अडकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतची चौकशी सुरु होती.

सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तब्बल आठ तास चौकशी सुरु होती. यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) याबाबतच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोड्या वेळापूर्वीच दोघांना भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यानंतर आज दुपारी तिघांना संशयितांना कोर्टात हजर केले जाणार आहे. (Nashik Court)

- Advertisment -

ताज्या बातम्या