नाशिक । गोरख काळे
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकर्यांनी बाजारात जाणे टाळावे, याकरिता राज्य शासनाने थेट बांधावर खते पुरविण्याची योजना आखली आहे. यास शेतकर्यांचा प्रतिसाद मिळत असून बांधावरुन खते घेण्यात नाशिक जिल्हयातील शेतकरी राज्यात दुसर्यास्थानी असल्याचे चित्र आहे. नाशिकच्या 25 हजार 538 शेतकर्यांनी 6 हजार 679 मेट्रीक ट्न रासायनिक खत बांधावरून उचलले आहे. तर बुलढाणा जिल्हयात सर्वाधिक खते बांधावरुन उचलली आहे.
खरीप हंगाम संपेपर्यंत शेतकर्यांना थेट त्यांच्या गावात खते बियाणे पुरविली जाणार आहे. दि. 11 जून पर्यन्त नाशिक जिल्हयातील शेतकर्यांना 1 हजार 886 गटाद्वारे विविध कंपन्यांचे रासायनिक खते देण्यात आले आहेत.
पुढील काही दिवसात ही संख्या आणखीन वाढणार आहे. दरम्यान मागील वर्षी प्रमाणे राज्यात कोरोना असल्याने शेतकरी वर्गाकडून खते, आणि बियाणे घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होण्याची भीती असल्याने कृषी विभागाकडून गेल्या वर्ष भरापासून खरीप हंगामात खते दिली जात आहे. कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे कोरोना संकटात शेतकर्यांची होणारी पळापळ काहीशी थांबली आहे.
शेतकर्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत करून ठेवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने काही निर्बंध घातले आहे. कृषी विभागाने गावोगावी शेतकर्यांचे गट स्थापन करून त्या गटातील शेतकर्यांना एकत्र करून त्यांना आवश्यक असलेली खते व बियाणांची मागणी लक्षात घेऊन तालुक्यातील मुख्य डीलरकडे खताची मागणी केली जाते.
खताची किंवा बियाणांची मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर थेट कंपनी प्रतिनिधीशी बोलून डीलरचा दर किंवा त्यापेक्षाही कमी दराने खते व बियाणे ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली जात आहे. शेतकर्यांना शहराच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठीचा खर्च तसेच वाहतूक खर्चाची बचत होत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून सुरक्षितपणे खते आणि बियाणे मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.
चौकट
विभागातही नाशिक अव्वल
बांधावरुन खते घेण्यात नाशिक जिल्हा राज्यात दुसर्यास्थानी असताना नाशिक विभागत देखील नाशिक जिल्हा रासायनिक खते घेण्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अव्वलस्थानी आहेत. नाशिक 25 हजार 538 शेतकर्यांनी 1 हजार 886 गटामार्फत 6 हजार 679 मेट्रीक ट्न खत उचलले आहे. तर धुळे जिल्हयातील 6 हजार 126 शेतकर्यांनी 2 हजार 51 मे.ट खत, नंदूरबार मधील 1 हजार 369 शेतकर्यांनी 480 मे.ट तर जळ्गांव जिल्ह्यातील 4 हजार 43 शेतकर्यांनी 566 मे.ट खत दि. 11 जून पय तर् उचलले आहे.
…… …….
कृषी विभागाच्या बांधावर खते उपक्रमास जिल्ह्यातील शेतकर्यांंचा चांगला प्रतिसाद मिळ्तो आहे, शेतकरी गटांंना मद्त करण्यासाठी प्रयत्न आहे, तालुका अधिकारी, शेतकर्यांचे गट मिळून चांगला सहभाग घेत आहे. शेतकर्यांचा वाहतूक खच र्वाचत असून आताच खते मिळ्त असल्याने शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरत आहे.
सुनिल वानखेडे, विभगीय अधिक्षक कृषी अधिकारी,