नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तामिळनाडूतील एका कंपनीला (Company) पीडब्ल्यूडीकडून नाशिक-निफाड या मार्गाच्या (Nashik-Niphad Route) रस्ते बांधणीचे कंत्राट मिळवून देत एका मुख्य संशयितांसह (Suspect) याच कंपनीतील संशयितांनी संगनमत करुन नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या २५ कोटी रुपयांपैकी १२ कोटी ६१ लाख रुपये परस्पर हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत कंपनीने कंत्राट मिळवून देणाऱ्या मुख्य संशयित आणि इतर संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) फिर्याद दिली आहे. त्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकूर अहमद जमालुद्दीन सैय्यद (वय ६३, रा. डी एक्स ए-२, ब्लॉक नं.सी, एडब्ल्यूएचओ, पवननगर, सिडको, नाशिक, मुळ रा. सिकर (राजस्थान) व संदीप रविंद्र भाटीया, करण सिंग, जोजी थॉमस व इमोर्टल कंपनीचे काही संचालक अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पंकजकुमार आनंदकुमार ठाकूर (रा. आनंद मिलन, सबवे, सांताक्रूझ, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, तामिळनाडूतील अबान गृप कंपनी अंतर्गत ‘एशियन टेक’ ही कंपनी सरकारी व खाजगी रस्ते बांधकाम करुन देते. तिचे उपकार्यालय शहरातील तिडके कॉलनीतील यश अपार्टमेंट येथे होते.
दरम्यान, याच कंपनीच्या संपर्कात असलेल्या शकूर याने सन २०१४ ते २०२२ या कालावधीत एशियन टेक व आयएस झा या कंपन्यांचा विश्वास संपादन करुन ‘आयएस इफ्रा अँड बिल्डकॉन’ ही कंपनी ५० टक्के भागीदारीत चालू केली. तेव्हा या कंपनीस महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाशिक-निफाड- छ. संभाजीनगर हा मार्ग बीओटी तत्त्वावर तयार करण्यासाठी अंदाजे सोळा कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. हे रस्ते काम पूर्ण झाल्यावर कंपनीने ६ मार्च २००४ पासून ओढा येथे टोलनाका (Toll Booth) उभारुन वसुली केली. दरम्यान, या रस्त्याचे काम तसेच मेंटनन्स (देखभाल) चांगली झाली नाही असे कारण देत, पीडब्लूडीने हा टोलनाका ताब्यात घेतला. त्यामुळे ‘आयएस इफ्रा अँड बिल्डकॉन’ कंपनीचे नुकसान झाले.
त्यामुळे कंपनीने पीडब्ल्यूडविरोधात नुकसान (Damage) भरपाईसाठी कंपनी लवादात (एनसीएलएटी) दावा दाखल केला. त्याचा निकाल कंपनीच्या बाजूने लागून लवादाने पीडब्ल्यूडीला (PWD) सोळा टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पीडब्लूडीने ही नुकसान भरपाई व्याजासह २५ कोटी रुपयांपर्यंत असताना १२ कोटी रुपये ६१ लाख रुपये ‘आयएस इन्फ्रा अँड बिल्डकॉन’ ला दिली. मात्र, आयएस इफ्रा अँड बिल्डकॉनच्या वरील संशयितांनी संगनमत करुन बँक्त बनावट कागदपत्रे सादर करून वरील रक्कम ‘इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले. ही माहिती जोजी थॉमस याने अबान ग्रुपला कळविली नाही व फसवणूक (Fraud) केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चार आण्याची कोंबडी अन्?
सार्वजनिक बांधकाम विभागाने वरील रस्त्याच्या बांधणीसाठी कंपनीस १६ कोटी रुपये मंजूर केले. कालांतराने मेटनन्स व इतर कारणातून कंपनीचा टोल नाका बंद केला. याविरोधात कंपनीने दावा टाकून तो जिंकला. त्यामळे रस्ते कामास १६ कोटी रुपये मंजूर असताना, या विभागाने व्याज व नुकसान भरपाईपोटी कंपनीस २५ कोटी रुपये मोजावे लागल्याचे समजते. त्यामुळे पीडब्ल्यूडीला जास्तीचा भुर्दंड सोसावा लागला आहे.