Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : सायबर चोरट्यांनी दीड कोटी लाटले; 'ज्वेलरी मार्केटिंग' मधून...

Nashik Fraud Crime : सायबर चोरट्यांनी दीड कोटी लाटले; ‘ज्वेलरी मार्केटिंग’ मधून गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) वर्षअखेरच्या तोंडावर पुन्हा एकदा डिजिटल आमिषांचा सापळा रचत सेवानिवृत्तांसह व्यावसायिकांना गंडा घातला आहे. नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik City Police Station) दाखल दोन्ही स्वतंत्र गुन्ह्यांत तक्रारदारांची तब्बल सुमारे १ कोटी ४० लाखांहून अधिक रक्कम सायबर चोरट्यांनी लाटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही घटनांत फसवणुकीची पद्धत व आमिष पूर्णपणे वेगवेगळे असले तरी, विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहार करायला भाग पाडणे, ही चोरट्यांची समान ‘मोडस’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

‘शेअर मार्केट ट्रेडिंग’ या नावाखाली नागरिकांना अधिक नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत, तसेच टेलिग्राम चॅनलद्वारे मार्गदर्शन केल्याचा बनाव रचण्यात आला. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून थोडा नफा दाखवण्यात आला. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर, संबंधित नागरिकाकडून वेगवेगळ्या टप्प्यांत ८० लाख १० हजार ६५० रुपये ऑनलाईन (Online) पद्धतीने उकळण्यात आले. नफा काढण्याचा प्रयत्न करताच, ‘टॅक्स’, ‘प्रोसेसिंग फी’ अशा नव्या कारणांची यादी पुढे करत आणखी रकमेची मागणी करण्यात आली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिसांत तक्रार दाखल झाली. दुसऱ्या प्रकरणात, ‘ऑनलाईन ज्वेलरी मार्केटिंग या वेगळ्याच प्रकारातून सायबर चोरट्यांनी नागरिकाला जाळ्यात ओढले.

YouTube video player

टेलिग्रामवरील (Telegram) एका खात्याच्या माध्यमातून तसेच एका संकेतस्थळाच्या (वेबसाइट) लिंकद्वारे ‘डिजिटल गोल्ड’ व ‘ऑनलाईन दागिने खरेदी-विक्रीत अधिक परतावा’ असे आमिष दाखविले. सुरुवातीला विश्वासार्ह वाटणारे स्क्रीनशॉट, नफ्याचे आकडे आणि बनावट ग्राहक अभिप्राय दाखवून विश्वास संपादन करीत वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदाराने ५९ लाख ९९ हजार ३४४ रुपये वर्ग केल्यावर शिल्लक नफा काढताना मात्र खात्यांवर तांत्रिक अडचणी दाखवून संपर्क बंद करण्यात आला व पैसै लाटण्यात आले.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...