Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Fraud Crime : फेसबुकवरून भरतीची फेक जाहिरात; पाच बेरोजगारांची ३३ लाखांची...

Nashik Fraud Crime : फेसबुकवरून भरतीची फेक जाहिरात; पाच बेरोजगारांची ३३ लाखांची फसवणूक

प्रत्यक्ष भेटही नसताना दिले पैसे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय रेल्वेत नोकरी ( Indian Railways Jobs) देण्याची आकर्षक जाहिरात फेसबुकवर (Facebook) झळकवून सायबर संशयितांनी नाशिकमधील (Nashik) तरुणी व तिच्या चार मित्र-मैत्रिणींची तब्बल ३२ लाख ९८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. विशेष म्हणजे, संशयित व बेरोजगार तरुण-तरुणी यांची कधीही प्रत्यक्ष भेट आणि ओळख नसतानाही केवळ सोशल मीडियावरील संवादाच्या आधारे प्रत्येकी आठ लाख रुपये उकळण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी ३२ वर्षीय तरुणी असून शहरात वास्तव्यास आहे. ती १४ डिसेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फेसबुकवर ‘सर्किंग’ करत होती. तेव्हा तिने रेल्वे नोकरी भरतीची जाहिरात पाहिली. जाहिरातीत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डामार्फत केंद्र सरकारची नोकरी (Job) मिळवून देण्याचा दावा होता.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Leopard News : रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

याच मजकुरावर विश्वास ठेवून तिने फेसबुक अकाऊंटवर संपर्क साधला. त्यानंतर संशयितांनी (Suspected) तिला व तिच्या सहकाऱ्यांना व्हॉटस्अॅपवर ‘हाय’ करून संवाद सुरू केला. सुरुवातीला शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो आदी माहिती मागवली. सर्व प्रक्रिया अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यासाठी तशी भाषा, सरकारी संकेतस्थळांसारखी प्रोफाईल्स व विश्वासार्ह संदेश पाठवले. पुढील टप्प्यात विविध कारणांनी टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास सांगून नोकरी पक्की असे आश्वासन देत तरुणीसह तिच्या चार मित्रांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळले.

असे झाले उघड

पैसे (Money) मिळाल्यानंतर रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या नावाने बनावट अपॉईंटमेंट लेटर व जॉइनिंग लेटर थेट उमेदवारांच्या व्हॉटस्अॅपवर पाठवले. या कागदपत्रांमुळे पाचही बेरोजगार आनंदी झाले. यानंतर संशयितांनी ऑनलाईन मेडिकल टेस्ट पूर्ण करवून घेत जॉइनिंगसाठी’ रेल्वेच्या एका मंडळ कार्यालयात येण्यास सांगितले. संबंधित ठिकाणी पोहोचण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी फोन व मेसेजद्वारे केली. मात्र, पाचही जण दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता तेथे कोणताही अधिकारी किंवा संपर्क व्यक्ती आढळून आला नाही. वारंवार फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि सोशल मीडियावरील अकाऊंटस्वर एरर येत असल्याचे लक्षात येताच फसवणूक झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.

या गोष्टी टाळा

  • फेसबुक, व्हॉटस्अॅप, टेलिग्रामवर येणाऱ्या सरकारी नोकरीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.
  • रेल्वे, बँक, केंद्र किंवा राज्य शासनाच्या भरतीसाठीचे शुल्क खासगी बँक अकाऊंटवर घेतले जात नाही.
  • अपॉईंटमेंट लेटर, जॉइनिंग लेटर, मेडिकल कॉल लेटर फक्त अधिकृत सरकारी ई-मेल आयडीवरूनच येतात.
  • सोशल मीडियावर संपर्क करणाऱ्या व्यक्तीची भेट, कार्यालयाचा पत्ता व अधिकृत वेबसाईटची खात्री करावी.
  • आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, ओटीपी अनोळखी व्यक्तींना कधीही पाठवू नये.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...