शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade Wakad
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) खडकमाळेगाव व मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांकडून (Farmer) निर्यातक्षम द्राक्षे माल खरेदी करून तब्बल १४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी मध्यस्थ व निर्यातदार यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती…”; अजित पवारांचे दिंडोरीत मोठे विधान
याबाबत ज्ञानेश्वर वाळु रायते (वय ४७) रा.खडकमाळेगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची शेती ग.न.३७४ मध्ये अडीच एकर जमीन (Land) असून त्यात पाच वर्षांपूर्वी द्राक्षे लागवड केली आहे. दि.५ जानेवारी २०२४ रोजी व्यापारी संशयित आरोपी पूर्व अनिल चव्हाण रा.औद्योगिक वसाहत, महर्षीनगर पुणे, सुरज भिमराव कांबळे रा गणेश दर्शन क्र.३ आपटेवाडी बदलापुर इस्ट, वामसी कृष्णा गाजीथला रा.तिरुपती, आंध्रप्रदेश, तेजल अनिल चव्हाण, औद्योगिक वसाहत, पुणे मार्केट यार्ड हे आमचे द्राक्षे (Grapes) पाहणीस आले होते.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा; गुलाबी जॅकेट, बस अन् बरचं काही
यातील तेजल चव्हाण यांनी आम्ही आपल्या शेतातील (Farm) द्राक्षे खरेदीस इच्छुक असून इतर तीन संशयित आरोपी व शेतकरी दतात्रय भाऊसाहेब कोकणे, बापु अशोक रायते यांच्या समक्ष सर्व व्यवहार चेक व बाकी रोखीने करु असे सांगून दोन्ही बागेचा ७३ व ५२ रु.प्रतिकिलो ने भाव ठरवला. त्यानंतर संशयित आरोपींनी दि.१५ जानेवारी ते दि.२१ फेब्रुवारी या काळात माझ्या कुटुंबातील सदस्य व इतर मजुरांच्या सहाय्याने एक्सपोर्ट युनायटेड फ्रेश इंडिया द्राक्ष कंपनीने खुडा करुन त्यांच्या वाहनात घेऊन गेले. यात माझ्या एकूण ७ लाख ६५ हजार ८०३ द्राक्षे मुल्यापैकी ५० हजार बँकेत जमा करून उर्वरित ७ लाख १५ हजार ७७३ रुपयांचा पूर्वा चव्हाण यांची सही असलेला कॅनरा बँक (Canara Bank) नाशिकचा धनादेश दिला.
हे देखील वाचा : Ajit Pawar : विधानसभेला महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
यानंतर २६ जून रोजी बँकेत धनादेश टाकला असता खात्यावर पैसे शिल्लक नव्हते व पूर्वा चव्हाण यांचा मोबाईल बंद आढळून आला. तर बापू अशोक रायते रा. खडकमाळेगाव यांच्या द्राक्ष बागेच्या एकूण ३ लाख ८१ हजार ५४१ व मरळगोई खु.ता.निफाड येथील छबु महादु फापाळे यांचे ३ लाख ३५ हजार ८११ रुपये द्राक्षे मुल्यापैकी त्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने आरोपी पूर्वा चव्हाण व सूरज कांबळे यांनी वामसी कृष्णा गाजीथला व अनिल चव्हाण यांच्या मदतीने आमच्याकडील द्राक्ष माल खरेदी करुन आमची १४ लाख ३३ हजार १२५ रुपयांची माझी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणुक करुन विश्वास घात केला आहे म्हणून आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद देत आहे असे रायते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
हे देखील वाचा : आदिवासी बहुल जिल्ह्यांत आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांची माहिती
दरम्यान, या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) भा.द.वि.कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पुढील तपास सपोनि. भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.किशोर पवार करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा