Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Ganesh Visarjan 2025 : मंत्री गिरीश महाजनांनी वाजवला ढोल तर आमदार...

Nashik Ganesh Visarjan 2025 : मंत्री गिरीश महाजनांनी वाजवला ढोल तर आमदार फरांदे यांनी टाळ वाजवत दिली साथ

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

आज (शनिवार) लाडक्या गणरायाला (Ganpati Bappa) निरोप देण्यासाठी जुने नाशिक (Old Nashik) येथील पारंपारिक मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी ढोल वाजवला तर मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी त्यांना टाळ वाजवत साथ दिली. जोशपूर्ण वातावरणात पावसाच्या सरींमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती.

- Advertisement -

जुने नाशिक येथील ऐतिहासिक चौक मंडई, वाकडी बारव येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास पहिल्या महापालिकेच्या मानाच्या गणपतीला पुष्पहार अर्पण करून तसेच मिरवणुकीचे नारळ फोडून विसर्जन मिरवणूक (Immersion) सुरू करण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजप नेते सुधाकर बडगुजर, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, महापालिका जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player

दरम्यान, माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांच्या मेन रोड येथील युवक मित्र मंडळाने यंदा अघोरीचा देखावा सादर करीत मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले. हरियाणा येथून आलेल्या कलाकारांनी रस्त्यावर आपले कलेचे प्रदर्शन केले. त्यांना पाहण्यासाठी महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...