Saturday, September 21, 2024
Homeनगरनाशिक पदवीधरचा निकाल नगर जिल्हा ठरवणार?, वाचा काय सांगते आकडेवारी...

नाशिक पदवीधरचा निकाल नगर जिल्हा ठरवणार?, वाचा काय सांगते आकडेवारी…

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

राजकीय घडामोडींमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल नगर जिल्ह्यातील मतदारच ठरवणार आहे. या निवडणुकीतील एकूण अडीच लाखांवर मतदारांमध्ये तब्बल 44 टक्के मतदार फक्त नगर जिल्ह्यातीलच आहेत.

त्यामुळे हे मतदार ज्या उमेदवाराच्या पारड्यात सर्वाधिक क्रमांक 1 असा पसंती क्रमांक नोंदवतील, तो उमेदवार बाजी मारणार आहे. याचा अर्थ नाशिक पदवीधर निवडणुकीत नगर जिल्ह्यातील मतदार किंगमेकर ठरणार आहेत. नगर जिल्ह्यातील चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या 44 टक्के मतांतील किती मते हे उमेदवार घेतात, यावर अन्य जिल्ह्यांतील उमेदवार व मतदारांच्या मतांची गोळाबेरीज निर्णायक ठरणार आहे.

“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

नाशिक पदवीधर निवडणुकीत नगर जिल्ह्यातून या मतदारसंघाचे विद्यमान काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr Sudhir Tambe) यांनी पुन्हा उमेदवारी दाखल केली नसली तरी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा शिवाय अ‍ॅड. सुभाष जंगले (श्रीरामपूर, नगर), सुभाष चिंधे व पोपट बनकर (दोघे नगर) असे अन्य तीन उमेदवार आहेत. तर राहिलेल्या 12 उमेदवारांमध्ये नाशिक, धुळे, मालेगाव येथील उमेदवारांचा समावेश आहे.

पण नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील मतदार उमेदवारांसाठी किंगमेकर ठरणार असल्याचे मतदारांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. नगर जिह्यातून जो उमेदवार जास्त मतदान घेईल, तोच निवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता आहे. कारण एकूण मतदारांपैकी 44 टक्के मतदार नगर जिह्यातील आहेत.

“शेवटी काय भाजपाचे संस्कार…”; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसची जळजळीत टीका, शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान असून 2 फेबुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, नाशिक विभागातील नाशिकसह नगर, धुळे, नंदूरबार व जळगाव या 5 जिल्ह्यांत एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीतील मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीवर दावे व हरकती मागविण्यात आल्रा. त्यानुसार पहिल्या पुरवणीत 48 हजार 178 मतदारांची नोंद झाली. त्यामध्ये 1 हजार 645 मतदारांची नावे दुबार आढळल्याने ती वगळण्यात आली.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा 29 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 पर्यंत मतदार नोंदणीची संधी देण्यात आली. त्यानुसार दुसर्‍या पुरवणीत 1 हजार 924 मतदारांची भर पडली. या दुसर्‍या पुरवणीत 2 हजार 643 नावे दुबार आढळली. त्यामुळे ही नावे वगळून नुकतीच जिल्हानिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिह्यात आहेत. नगर जिल्ह्यामध्ये 1 लाख 15 हजार 638 मतदार (44 टक्के), नाशिक जिह्यात 69 हजार 652 (25 टक्के), जळगाव जिल्ह्यात 35 हजार 58 मतदार (13 टक्के), धुळे जिह्यात 23 हजार 412 मतदार (10 टक्के) व नंदूरबार जिह्यात 18 हजार 971 (7 टक्के) इतके मतदार आहेत.

कडाक्याची थंडी…आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या…मग…

संगमनेरला सर्वाधिक नोंदणी

नगर जिल्ह्याची तालुका निहाय मतदारांच्या यादीत संगमनेर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल राहाता तालुका आहे. उर्वरित तालुक्यातील पदवीधरच्या मतदरांची संख्या कमी अधिक प्रमाणात आहे. ज्या प्रमाणे नाशिक विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असून त्यांच्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्याचप्रमाणे संगमनेर आणि राहाता तालुका या मतदाराला मतदान करतील तो उमेदवार नगर जिल्ह्यातून आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या