Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११...

Assembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११ उमेदवारांची घोषणा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या (Maharashtra) निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत मतदारसंघांसह उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र, अशातच आता निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘देशदूत’च्या यशस्वी उद्योजक पुरस्कारांचे वितरण

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यात रावेर, शिंदखेड राजा,वाशिम ,धामणगाव रेल्वे,नागपूर दक्षिण मध्य, साकोली,नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव,खानापूर या जागांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : ‘देशदूत’च्या लिगल नोटीस पोर्टलचे अनावरण

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व मतदारसंघ पुढीलप्रमाणे

१) शमिभा पाटील – रावेर २) सविता मुंढे – शिंदखेड राजा ३) मेघा किरण डोंगरे – वाशिम ४) निलेश विश्वकर्मा – धामणगाव रेल्वे ५) विनय भागणे – नागपूर दक्षिण मध्य ६) डॉ. अविनाश नान्हे – साकोली ७) फारुख अहमद – नांदेड दक्षिण ८) शिवा नारांगले – लोहा ९) विकास रावसाहेब दांडगे – छत्रपती संभाजीनगर पूर्व १०) किसन चव्हाण – शेवगाव ११) संग्राम कृष्णा माने – खानापूर

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...