Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी पिकअपला सिनेस्टाईल पकडलं अन् समोर आला 'हा' धक्कादायक...

Video : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी पिकअपला सिनेस्टाईल पकडलं अन् समोर आला ‘हा’ धक्कादायक प्रकार…

मालेगाव | Malegaon

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या वाहन ताफ्यातील एका गाडीला कट मारून पळणाऱ्या वाहनाचा दादा भुसेंनी पाठलाग करत पकडल्याची घटना घडली आहे. यामुळे दादा भुसेंनी अगदी सिनेस्टाईल या गाडीला पकडले आहे. मात्र या पिकअप वाहनाला पकडल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

कारण या वाहनातून चक्क अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत होती. झाल असं की नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगाव दौऱ्यावर होते, यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला एका पीकअप गाडीने कट मारला (Hit by a pickup truck) कट मारून त्या वाहनचालकाने कट मारत वाहन जोरात पळवले. मात्र, त्याच वेळी दादा भुसेंनी पोलिसांना त्या गाडीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्या गाडीला रोखले.

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक, ATS ची कारवाई

मंत्री दादा भुसे यांनी त्या वाहनचालकाची कानउघडणी केली. यावेळी त्या वाहनचालकाच्या वागण्याचा संशय आल्याने दादा भुसेंनी त्या गाडीची चौकशी केली असता त्यांना धक्कादायक बाब समजली. अवैधरित्या गोवंश मांस (Illegally transporting) वाहतूक करत असल्याची बाब समोर आली. खरंतर दादा भुसे यांना गाडीने कट मारल्याने गाडी चालकावर संशय आला होता. पोलिसांचा ताफा असतांना कट मारण्याची इतकी हिंमत कशी काय झाली? काही वेगळा कट आहे का? दारू पिऊन कुणी वाहन चालवत आहे का? असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित झाले होते.

पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

मात्र, सिनेस्टाईल पाठलाग करत दादा भुसे यांनी चौकशी करत असताना धक्कादायक बाब समोर आल्याने त्यांच्यासह असलेल्या पोलिसांनाही धक्का बसला. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहे.

खरंतर ही संपूर्ण घटना गंभीर आहे. रात्रीच्या दरम्यान गस्त वाढवून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे थेट मंत्र्याच्या गाडीला कट मारला जात असेल तर अवैध वाहतूक करणाऱ्या चालकांची कुठवर मजल गेली आहे. याबाबत चर्चा होऊ लागली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या