Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : पावसाचा घाट, स्मार्ट सिटीने लावली नाशिककरांची वाट

Video : पावसाचा घाट, स्मार्ट सिटीने लावली नाशिककरांची वाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस बरसत आहे. गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र आहे.

नाशिकच्या स्मार्ट सिटीने अनेक रस्त्यांवर खोदकाम करून ठेवले आहे. तसेच अनेक रस्त्यांची काम अर्धवट सोडल्याने ठीकठिकाणी खड्डे दिसून येत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या चेंबरसह मेनरोड परिसरातील चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे परिसरातील दुकानदारांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. पाहा व्हिडीओ…

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : त्र्यंबकेश्वरला धो-धो पाऊस; धबधबे वाहू लागले, मनमोहक दृश पाहा इथे

- Advertisment -

ताज्या बातम्या