Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक - जयपूर विमानसेवा सुरु होणार

नाशिक – जयपूर विमानसेवा सुरु होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असल्यामुळे इंडिगो विमान कंपनीने 29 ऑक्टोबरपासून नाशिक-इंदोर-जयपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे 3 तासांमध्ये नाशिकहून जयपूरला पोहोचणे शक्य होणार आहे. नाशिकहून राजस्थानला मोठ्या प्रमाणात नागरिक व पर्यटक जात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबाद इंदोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू आहे.

इंडिगो कंपनीने नाशिक जयपूर विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला असून, 29 तारखेपासून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार जयपूरहून सकाळी 11.20 मिनिटांनी विमान उड्डाण घेणार असून नाशिकला दुपारी 2.20 नाशिकला पोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात 2.40 मिनिटांनी निघून 5 वाजून 30 मिनिटांनी जयपूरला पोहोचणार आहे. या विमानसेवेमुळे नागरिकांचा पैसा व वेळ दोन्ही वाचणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या