Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याPolice Van Accident : नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वाहनाचा चांदवड नजिक अपघात

Police Van Accident : नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वाहनाचा चांदवड नजिक अपघात

नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यातील चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस वाहनास चांदवड नजिक राहुड घाटात अपघात झाला. या अपघातात नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातात चालक पुरुषोत्तम मोरे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

तसेच निलेश लोंढे, जयवंत चौधरी, कुमार जाधव, किरण आहेर, चेतन तुंगर, निलेश खंडाळे, शीतल गायकवाड, किशोर बोडके, नानाजी मारवांडे, शांताराम गाढे, निलेश आहीरे हे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत सोमा टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना मदत कार्य केले. सदर कर्मचारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्त ताफ्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...