नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील जय भवानी रोडवर (Jay Bhavani Road) आज (गुरुवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये (Citizen) भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जय भवानी रोडवर राहणारे नेहरा यांच्या घरासमोर सदर बिबट्या जाताना दिसला असून, हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. तीनच दिवसांपूर्वी जय भवानी रोडवर लोणकर मळ्यात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता पुन्हा या परिसरात आज सकाळी बिबट्या भर रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने वनविभागाने (Forest Department) पिंजरे (Cage) लावावे अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या युवती सेनेच्या नेत्या योगिता गायकवाड यांनी केली आहे.





