Sunday, November 24, 2024
Homeनाशिकठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर आहेत 'एवढ्या' कोटींचे मालक

ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

नाशिक | Nashik

सध्या देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत असून सगळीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. यात महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघ यंदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेद्वारांवरून चांगलाच चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) कोट्यातून नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या तर महायुतीच्या कोट्यातून शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) वाट्याला आली आहे. यामध्ये महायुतीचा (Mahayuti) उमेदवार अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी जाहीर करण्यात आला. तर महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या विजय करंजकर यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात चांगलीच नाराजी पाहायला मिळाली. यामुळे आता या नाराजीचे रुपांतर लोकसभा निवडणुकीत बंडखोरीत झाले आहे.

विजय करंजकर (Vijay Karnajkar) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवडणुक अर्जासोबत आपल्याकडे किती कोटींची संपत्ती (Assets) आहे, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार करंजकर यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. तर करंजकर यांना अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

करंजकर यांनी प्रतिज्ञापत्रासोबत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यांचे बारा बँकांमध्ये खाते आहेत. या खात्यांमध्ये २४.६७ लाख रुपये जमा आहेत. तर विजय करंजकर यांच्याकडे १२.५६ लाख तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे २७.३८ लाख रुपये रोख रक्कम आहे. त्यासोबतच विविध सहकारी बँकांचे ८६, १०० रुपयांचे शेअर्स देखील करंजकर यांच्याकडे आहेत. याशिवाय करंजकर यांची मॅक्स लाइफ कंपनीची एक तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे तीन विमा पॉलिसी असून त्यांचे एकत्रित मूल्य ६.६२ लाख आहेत. तसेच विजय करंजकर यांनी आपल्या पत्नीकडून दोन लाख रुपये आणि योगेश हरक यांच्याकडून ९.५० लाख रुपये उसणे घेतले आहेत.

दरम्यान, विजय करंजकर यांच्याकडे भगूर शहरात दहा शेत जमिनींसह बांधिव आणि अन्य निवासी मालमत्ता असून त्याची किंमत सुमारे २४ कोटी आहे. याशिवाय विजय करंजकर यांच्याकडे २४३० आणि पत्नी अनिता यांच्याकडे १५०० ग्रॅम असे पावणेतीन कोटी रुपयांचे सोने असून या सर्व संपत्तीची किंमत ३.९२ कोटी आहे. तसेच विजय करंजकर यांच्याकडे फॉर्च्यूनर, जीप, ट्रॅक्टर, फियाट या वाहनांसह बुलेट मोटरसायकल आणि एक स्कूटर देखील असून त्यांच्यावर दोन बँकांचे १६.३२ लाखांचे कर्जही आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या