Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik Mayor Election : मोठी बातमी! भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी 'यांच्या' नावावर...

Nashik Mayor Election : मोठी बातमी! भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार अर्ज

नाशिक | Nashik

नाशिक महापालिकेची (Nashik NMC) महापौरपदाची निवडणूक (Mayor Post Election) शुक्रवारी (दि.६) पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने महापौर, उपमहापौर भाजपचाच (BJP) होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहापौर पदाचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचे नाव ठरविण्यात आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक, कुणाला मिळणार संधी?

YouTube video player

भाजपकडून महापौरपदासाठी आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित झाले आहे.तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिद्र सानप यांचे नाव निश्चित झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा काही वेळातच मंत्री गिरीश महाजन करणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे उपमहापौरपदासाठी शिंदे सेनेकडून प्रविण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेले महापौर पदासाठी अर्ज

दरम्यान, थोड्याच वेळात आडके आणि सानप महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याकरिता महापालिकेत दाखल होणार आहेत. आज (मंगळवारी) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज विक्री सुरु होती. त्यानंतर आता मनपा मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात दुपारी तीन वाजेपर्यत अर्ज दाखल करता येणार आहेत.

ताज्या बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या, थेट सरकारी...

0
मुंबई । Mumbai राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर...