नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) प्रत्यक्ष मतदान एक दिवसावर आले असून ऐन थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवकांमध्ये (Corporators) थेट लढतींमुळे अनेकांचे राजकीय भवितव्य आता एकमेकांच्या हाती आहे. एकूण ८७ माजी नगरसेवक निवडणूक लढवत असून त्यापैकी तब्बल ५२ माजी नगरसेवक एकमेकांविरुद्ध आमने-सामने उभे ठाकले आहेत. यामध्ये एकूण २५ पैकी २३ ठिकाणी सरळ तर दोन ठिकाणी तीन माजी नगरसेवक आमनेसामने निवडणूक रिंगणात आहेत. परिणामी, किमान २७ माजी नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
महापालिकेच्या १२२ जागांसाठी एकूण ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात उरले आहेत. यात माजी नगरसेवकांमधील थेट लढतींमध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष प्रकर्षाने दिसून येत आहे. तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होत आहे. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने प्रस्थापित माजी नगरसेवकांचे समीकरण अधिकच बिघडण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक, रंजना भानसी, नयना घोलप, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, अजय बोरस्ते यांच्यासह ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : मतदानाआधी ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात; मतांचा फुटला मोठा भाव
राजकीय जाणकारांच्या मते, माजी नगरसेवकांमधील या थेट लढतींमध्ये जर मतदारांनी नव्या किंवा अपक्ष उमेदवारांना संधी दिली, तर घरी बसणार्या माजी नगरसेवकांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे ही निवडणूक अनेकांसाठी ‘राजकीय अस्तित्वाची कसोटी’ ठरणार असल्याचे चित्र आहे. निवडणुकीतील उमेदवारांपैकी ८७ माजी नगरसेवक रिंगणात आहे. माजी नगरसेवकांपैकी तब्बल ५६ नगरसेवक आमने-सामने आले आहेत. प्रभाग तीन ’अ’मध्ये तीन नगरसेवक आमने-सामने आहेत. तर प्रभाग १९ ’क’मध्ये देखील तीन नगरसेवक समोरासमोर लढत देत आहेत. ११ जागांवर भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे.
भाजपाचे सर्वाधिक माजी नगरसेवक
या निवडणुकीमध्ये माजी ५२ नगरसेवक एकमेकांसमोर उभे आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक -१९, शिवसेना -१४, शिवसेना (उबाठा)- ७, काँग्रेस -१ अपक्ष -५, मनसे – २ राष्ट्रवादी काँग्रेस -१, माकप -२ आणि रिपाइं – ०१
हे देखील वाचा : Nashik MC Election : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! EVM मशीनसह मतदान साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना
रिंगणातील आमनेसामने माजी नगरसेवक
प्रभाग 1 – ब – रंजना भानसी (भाजप) – गणेश चव्हाण (शिवसेना)
प्रभाग 3 -अ – प्रियांका माने (भाजप) – पूनम मोगरे (शिवसेना) – रिमा भोगे-काकडे (उबाठा)
प्रभाग 3 – क – मच्छिंद्र सानप (भाजप) – रुची कुंभारकर (अपक्ष)
प्रभाग 5 – ड – गुरुमित बग्गा (भाजप) – अशोक मुर्तडक (शिवसेना पुरस्कृत)
प्रभाग 7 – ड – योगेश हिरे (भाजप) – अजय बोरस्ते (शिवसेना)
प्रभाग 10-क – माधुरी बोलकर (भाजप) – पल्लवी पाटील (शिवसेना)
प्रभाग 11-अ – सीमा निगळ (शिवसेना) – अॅड. वसुधा कराड (माकप)
प्रभाग 11-ड – सलीम शेख (मनसे) – प्रकाश लोंढे (रिपाइं)
प्रभाग 12-ड – शिवाजी गांगुर्डे (भाजप) – समीर कांबळे (शिवसेना)
प्रभाग 15-क – सचिन मराठे (भाजप) – गुलजार कोकणी (उबाठा)
प्रभाग 16-अ – कुणाल वाघ (भाजप) – राहुल दिवे (शिवसेना)- रमेश जाधव (काँग्रेस)
प्रभाग 16-ड – सुमन ओहोळ (अपक्ष) – सुषमा पगारे (अपक्ष)
प्रभाग 18- ड – विशाल संगमनेरे (भाजप) – सुनील बोराडे (शिवसेना)
प्रभाग 19- क – जयश्री खर्जुल (शिवसेना) – भारती ताजनपुरे (उबाठा) –
प्रभाग 22-अ – नयना घोलप (भाजप) – वैशाली दाणी (उबाठा)
प्रभाग 23-अ – रूपाली निकुळे (भाजप) – सविता गायकवाड (अपक्ष)
प्रभाग 24-क – राजेंद्र महाले (भाजप) – सीमा बडदे (उबाठा)
प्रभाग 26- ड – भागवत आरोटे (भाजप) – सचिन भोर (माकप)
प्रभाग 27-क – कावेरी घुगे (भाजप) – किरण गामणे (शिवसेना)
प्रभाग 28-ब – प्रतिभा पवार (भाजप) – शीतल भामरे (शिवसेना)
प्रभाग 28-ड – डी. जी. सूर्यवंशी (उबाठा) – दिलीप दातीर (अपक्ष)
प्रभाग 29-क – छाया देवांग (भाजप) – सुमन सोनवणे (शिवसेना)
प्रभाग 30- क – दीपाली कुलकर्णी (भाजप) – अर्चना जाधव (उबाठा)
प्रभाग 30-ड – अजिंक्य साने (भाजप) – सतीश सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 31-ड – सुदाम डेमसे (शिवसेना) – सुदाम कोंबडे (मनसे)




