नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, पाहिला कल हाती आला आहे.
प्रभाग क्रमांक २५ मधून सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. तर २९ मधून टपाली मतदानात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर आहेत. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार होते. यातील निम्म्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.




