Friday, January 16, 2026
HomeनाशिकNashik MC Election Result : प्रभाग क्रमांक ३० मध्ये गोंधळ; खुर्च्या फेकल्या,...

Nashik MC Election Result : प्रभाग क्रमांक ३० मध्ये गोंधळ; खुर्च्या फेकल्या, पोलिसांचा हस्तक्षेप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. त्यानतंर आज (दि.१६) रोजी मतमोजणी झाली असता भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरु असून, प्रभाग क्रमांक ३० मध्ये गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

प्रभाग क्रमांक ३० मधील भाजप उमेदवार अजिंक्य साने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी एमआयएमचे उमेदवार शाह मोसिन गुलाम यांना ९ हजार मते मिळाल्याचे जाहीर केले. त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने बाचाबाची झाली. तसेच काही पोलीस देखील खाली पडले. यानंतर पोलिसांनी वाढीव कुवत मागविण्यात आली.

हे देखील वाचा : Nashik MC Election Result : नाशकात दिग्गजांना धक्का; ‘या’ बड्या नेत्यांना करावा लागला पराभवाचा सामना

दरम्यान, सध्या याठिकाणी मतमोजणी सुरु असून, अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. तसेच परिस्थिती देखील नियंत्रणात आहे. त्यामुळे आता या प्रभागात नेमका कोणता उमेदवार विजयी होता, हे बघणे महत्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या