Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक,...

Nashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक, कुणाला मिळणार संधी?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेची (Nashik NMC) महापौरपदाची निवडणूक (Mayor Post Election) शुक्रवारी (दि.६) पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने महापौर, उपमहापौर भाजपचाच (BJP) होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे. दरम्यान महापौर, उपमहापौर अर्ज स्वीकृतीची मंगळवारी (दि.३) दुपारी दोन वाजेपर्यतची मुदत आहे.

- Advertisement -

आज (मंगळवारी) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अर्ज विक्री तर १ ते २ वाजे दरम्यान अर्ज दाखल प्रक्रिया मनपा मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात होणार आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिक महापालिकेत भाजप एकटीच सत्तेत बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे सेनेचे (Shinde Shivsena) अवघे २६ नगरसेवक आहे. मात्र, तरीही विलास शिंदे यांच्यासह पक्षाच्या चौघांनी महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज घेतल्याने सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेले महापौर पदासाठी अर्ज

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आज नगरसेवकांची (Corporators) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीस महाजन यांच्यासह शहरातील तिन्ही आमदारांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते? याकडे भाजप नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

भाजपकडून कोणाला संधी?

सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या नाशिक मनपाच्या महापौर पदावर भाजपकडून कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपचे गटनेते अॅड. श्याम बडोदे यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन असे चार अर्ज प्रशासनाकडून घेतले आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच नगरसेविका दीपाली गिते यांनी देखील महापौर, उपमहापौरचे तब्बल सहा अर्ज घेतले आहे. गिते यांनी स्वतंत्र अर्ज घेतल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी या निमित्ताने समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेत महासभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड होणार आहेत.

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...