Saturday, May 4, 2024
Homeनाशिकगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज

गरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज

सातपूर | प्रतिनिधी

करोना या आजारामुळे शहरभरात संचारबंदी लागू झाल्यानंतर ठिकाणी ट्रक चालक अडकून पडले आहेत.  यासोबतच आपल्या घरी पोहचण्याच्या घाईने मुंबईहून पळालेल्या काही नागरिकांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेत विविध शाळांमध्ये सुरक्षित केले. या सर्व लोकांच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करण्यासाठी नाशिकच्या उद्योग नगरीने पुढाकार घेतला असून महिंद्रा अँड महिंद्रा सिएट अग्रवाल समाज यांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे.

- Advertisement -

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कंपनी सुरू असताना दररोज दोन हजार लोकांचा जेवण तयार होत असतं त्याच धर्तीवर कंपनीकडून जेवणाची पाकीट तयार करून ठिकाणच्या अडचणीतील लोकांना हे वाटप करण्यात आले.

त्यात प्रामुख्याने आपल्या आपल्या गावाकडे परतणाऱ्या व ट्रक कंटेनर मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुमारे 2000 तयार अन्नाची पाकिटे वाटप करण्यात येतात.

यासोबत महिंद्रा कंपनीचे वाहने घेऊन जाणारे कंटेनर तसेच कच्चामाल आणणारे ट्रक चालक हे संचारबंदी मध्ये अडकलेले आहेत. याठिकाणी अडकलेल्या नागरिकांना धान्य व अन्नाची पाकीटे वितरित करण्यात आली याकामी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाशिक प्लांट एड व उपाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्मिक उपमहाव्यवस्थापक चंद्र बॅनर्जी व कमलाकर घोंगडे व टीम विशेष प्रयत्नशील आहे

शहर परिसरात कष्टकरी मोठ्या संख्येने थांबलेले आहेत त्यांना आपल्या घरी जाणे अशक्य असल्याने अशा अडचणीत असलेल्या नागरिकांना सिएट कंपनीच्या वतीने सकाळी साडे सहाशे तर सायंकाळी साडेतीनशे पैकी त्यांचे वाटप केले जाते.

या उपक्रमासाठी कंपनीचे नाशिक प्लांट हेड  राजेन्द्र कुमार दास,प्रोडक्शन  प्रमुख महेन्द्र सावर्डेकर ,  सुरक्षा विभागाचे प्रमुख अविनाश वाघ, युनियन अध्यक्ष भिवाजी भावले, जनरल सेक्रेटरी कैलास धात्रक, तसेच कमिटी सदस्य विनय यादव, पोपट सावंत , एचआर विभागाचे जालिंदर कोंडे ,  रत्नाकर जाधव, जयराज बागुल, लालचंद यादव आणि अक्षय सोनार  आदी परीश्रम घेत आहेत.

अग्रवाल सभा नाशिक च्या वतीने कुंभमेळ्यात ही अन्नदान केले होते त्याच पार्श्वभूमीवर कीरियाड या दर्जेदार हॉटेलमध्ये अन्न शिजवून त्याची पाकिटे तयार करण्यात येत आहेत साधारण हजार पाकिटांची बांधणी या ठिकाणी केली जाते वही पाकिटे पोलिसांच्या माध्यमातून वाटण्यात येत आहेत.

त्यामुळे विविध कंपन्या देत असलेल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा देण्यात दिले जाऊ नये हा त्यामागील उद्देश असून पोलिस यंत्रणा या पाकिटांचे वाटप आपल्या पद्धतीने करीत आहेत. लवकर येण्यासाठी अग्रवाल सभा अध्यक्ष नेमीचंद पोद्दार सरचिटणीस विमल सराफ माजी अध्यक्ष ताराचंद गुप्त कोषाध्यक्ष राजस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे.

शिव भजन थाळीचे वाटप

शासनाने निर्धारित केलेल्या पाच रुपयात जेवण या संकल्पनेतील शिवभजन थाळी चे वाटप नागपुरात करण्यात आले सातपूर गावातील महिला बँकेच्या समोरील पडणार सव्वाशे लोकांना ही पाकिटे वाटप करण्यात आली याकामी नितीन निगळ जीवन रायते शिवानंद काळे निलेश मंजुरी निलेश नेलवाड नामदेव जेधे यांच्या प्रयत्नातून सुरक्षित अंतराचे नियम पाळत नागरिकांना वाटप करण्यात आले परीक्षा नागरिकांनी अत्यल्प असले पाच रुपये ही जमा न करतात अन्न घेतले यात लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती

- Advertisment -

ताज्या बातम्या