Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा; दराडे-गिते यांच्यात...

Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा; दराडे-गिते यांच्यात शब्दिक बाचाबाची

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) मतमोजणीस आज (सोमवार) सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ झाला असून, दराडे आणि गिते समर्थक यांच्यात बाचाबाची झाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंचे मतमोजणी प्रतिनिधी यांच्यावर शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आमदार किशोर दराडे आणि गोकुळ गिते यांच्यात बाचाबाची झाली. गिते यांच्या मतमोजणी प्रतिनिधीवर दराडे यांनी आक्षेप घेतल्याने हा वाद झाल्याचे समजते. दराडे हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या उपस्थितीवर घेतला.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा

दरम्यान, यानंतर आक्षेप घेणाऱ्या प्रतिनिधीला आमदार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केला हस्तक्षेप करत वाद मिटवला. यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांना बाजूला करण्यात आले. सध्या मतमोजणी पुन्हा सुरु झाली आहे. .

दोघांनी मतमोजणी ठिकाणी आणले वकील

अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून मुंबई हायकोर्टाचे वकील श्रीशैल्य देशमुख यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यातर्फेही विशेष वकील नियुक्त करण्याची मागणी केली गेली. त्यानंतर त्यांनीही वकील दिला असून, दोघांचेही वकील मतमोजणी ठिकाणी उपस्थित आहेत.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 – रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण...

0
नाशिक : प्रतिनिधी Nashik सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना वेग आला असून, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (NTKMA) गुणवत्ता नियंत्रण पथकाने तीन...