Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : मनपा आयुक्तांचा सिंहस्थ आढावा; अतिक्रमण हटवण्याचे आदेश

Nashik News : मनपा आयुक्तांचा सिंहस्थ आढावा; अतिक्रमण हटवण्याचे आदेश

तपोवन, नियोजित साधुग्राम परिसराला भेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी आज पंचवटी परिसरातील (Panchvati Area) विविध महत्वाच्या ठिकाणांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाबद्दल सूचना दिल्या. त्यामध्ये साधुग्राम परिसर, तपोवन परिसर, कुंभमेळा प्रशासकीय इमारत, सिटीलिंक बसडेपो, बेघर निवारा केंद्र, बटुक हनुमान मंदिर परिसर आणि नियोजित साधूग्राम जागेचा पहाणी दौरा केला.

- Advertisement -

आयुक्त खत्री यांनी पाहणीदरम्यान अतिक्रमण हटविण्याचे (Removal of Encroachments) आदेश देत स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीबाबत विविध सूचना केल्या, यावेळी त्यांनी संबंधित विभागांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सिंहस्थ महापर्वात देश विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सिंहस्थ कुंभ महापर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी (Departments) समन्वय साधत काम करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, स्वच्छतेवर विशेष भर देत भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांत नियोजन सुरू आहे, त्याची काटकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी तंबी त्यांनी दिली.

रामकुंड परिसराची सायंकाळी पाहणी

२०२७ मध्ये नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या कुंभ महापर्वाच्या पूर्वतयारीसाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. सकाळी पाहणी करुन सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या समवेत रामकुंड परिसराची पहाणी देखील करण्यात आली. रामकुंड परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या व झालेल्या कामाची या दौऱ्यात पहाणी करून जलद गतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त यांनी दिल्या.

भाविकांना त्रास नको

भाविकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी या दौऱ्यानंतर सांगितले. यानंतर रामवाडी येथील गोदाकिनारी विकसित झालेल्या गोदा वॉक या उद्यानाची पहाणी त्यांनी केली. या भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. मयूर पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...