Monday, April 27, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरातील नवी दिल्ली भागात स्फोट; परिसरात घबराट

Shrirampur : श्रीरामपुरातील नवी दिल्ली भागात स्फोट; परिसरात घबराट

महिलेसह तीन जण जखमी || भंगार गोळा करुन आणलेले गोळे फोडताना घडली घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील बजरंग चौकाजवळील नवी दिल्ली परिसरात काल सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारस अचानक स्फोट झाला. यात एक महिला गंभीर भाजली असून इतर दोनजण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

- Advertisement -

भंगार गोळा करुन आणलेल्या वस्तूंमधील गोळे फोडत असताना एका गोळ्याचा प्रंचड मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटामध्ये सुनिता नावाची भंगार गोळा करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेसह या भागात राहणार्‍या अनेक महिला गावोगावी जाऊन भंगार गोळा करण्याचे काम करतात. या महिलेने विळद घाट परिसरातून काही गोळे वेचून आणले होते. ते गोळे फोडले की त्यामध्ये तांबे, सिसे निघत असल्याने या महिला ते गोळे गोळा करण्याचे काम करतात व नंतर घरी आणून सदर गोळे फोडतात.

काल सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास विळद घाट परिसरातून गोळा केलेले गोळे फोडत असताना हा स्फोट झाला. यामध्ये सुनिता नावाची महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी प्रथम साखर कामगार रुग्णालय व तेथून लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली व सदर परिसर सील केला आहे. स्फोटातील काही तुकडे तपासणीसाठी फॉरेन्सिक पथकाने हस्तगत केले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच या मागचे कारण स्पष्ट होणार आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना
या भागात यापूर्वी म्हणजे 20 ते 25 वर्षापूर्वी अशाच प्रकारे भंगारात गोळा केलेले गोळे फोडताना स्फोट झाला होता. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. काल पुन्हा ही घटना घडल्याने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. शहरातही या स्फोटाची जोरदार चर्चा सुरु होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...