नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) शहरात २५ ठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ (Aapla Dawakhana) सुरू केला जाणार असून पहिल्या टप्प्यात १६ ठिकाणी जागा भाडेतत्त्वावर घेऊन रुग्णांवर उपचार (Treatment) केले जात आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत ते सुरू राहतात. या केंद्रावर एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक बहुउद्देशीय सेवक आणि एक सुरक्षारक्षक अशा पाच जणांची टीम कंत्राटी पद्धतीने प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आले आहे.
शहरातील (City) गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी याकरता राज्य शासनाने ही संकल्पना आणली. दरम्यान, प्रारंभी शहरात आपला दवाखान्यासाठी जागा शोधण्याकरता महापालिकेच्या सहाही विभागांत आरोग्य केंद्र असले तरी गेल्या वर्षापासून आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचे ठरवण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला. राज्यात या योजनेंतर्गत ७०० दवाखाने सुरू केले जाणार होते.
नाशिकमध्येदेखील (Nashik) २५ ठिकाणी आपला दवाखाना तयार केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १६ ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात महापालिकेला यश आले आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून किरकोळ आजारांवर उपचार केले जात आहेत. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांवरील ताण यामुळे कमी होणार आहे. दवाखान्यातून बाहेरून सेवा मोफत औषधोपचार, टेली कन्सल्टेशन महिन्यातून निश्चित दिवशी नेत्रतपासणी, एक्स-रेसाठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण केले जाते.
चार डॉक्टरांनी काम सोडले
शहरात एकूण सोळा ठिकाणी आपला दवाखाना सुरू होता, त्यापैकी चार केंद्रांतील डॉक्टरांनी काम सोडले असता, नव्याने डॉक्टरांना तेथे नियुक्ती दिली जाणार आहे.
आपला दवाखाना ठिकाणे
लवटेनगर, नाशिकरोड, भामरे हाऊस गोविंदनगर, पिंपळगांव खांब, मोती चौक, पवननगर, माळी गल्ली वडाळागांव, जमाई मन्जील वडाळानाका, सातभाई संकुल दसक, शास्त्रीनगर गोरेवाडी, मल्हार खाण, चुंचाळे गाव, सुदर्शन बंगलो कामटवाडे, कृष्णाई मंडई, साईग्राम अंबड लिंकरोड, द्वारका, द्वारका सर्कल सह्याद्री हॉस्पिटलजवळ
आपला दवाखान्यात रुग्णांवर उपचार केले जात असून एकूण सोळा ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रांसह आपला दवाखान्यातून आरोग्याची सेवा रुग्णांना दिली जात आहे.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा