Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Municipal Corporation Election : माजी नगरसेवक प्रकाश लोंढे तुरूंगातून निवडणूक लढवणार;...

Nashik Municipal Corporation Election : माजी नगरसेवक प्रकाश लोंढे तुरूंगातून निवडणूक लढवणार; कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका निवडणूकीसाठी (Nashik NMC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (मंगळवारी) शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. त्यामुळे मागील सहा दिवसांत शहरातील ११२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर शेवटच्या दिवशी १,३३१ उमेदवारांनी अर्ज भरले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी दोन हजार ३५७ उमेदवारी अर्ज हे ऐतिहासिकदृष्ट्या सर्वाधिक ठरले आहेत. काल प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात एका गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात असलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- Advertisement -

माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) एका गुन्ह्याच्या प्रकरणात (Case) तुरूंगात असतानाही त्यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून ते आरपीआयच्या (RPI) तिकिटावर निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांची सून अॅड. दीक्षा लोंढे यांनी दीड ते दोन हजार समर्थकांची भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोंढे कुटुंबातील सासरा आणि सून निवडणूकीच्या मैदानात असणार आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल; आज छाननी

सातपूर येथील ‘ऑरा बार’मधील गोळीबार प्रकरणात (Firing Case) रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे याला अटक करण्यात आली होती. तर दुसरा मुलगा भूषण प्रकाश लोंढे हा फरार झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मोठ्या शिताफीने भूषणसह त्याच्या साथीदाराला अटक केली होती.लोंढे पिता-पुत्रासांह त्यांच्या साथीदारांवर गोळीबार, खंडणी, हप्ता वसुली, मालमत्ता कब्जा, फसवणूक आणि दहशतीचे गंभीर गुन्हे नोंद असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाने मकोका लावला आहे.

दरम्यान, सध्या हे तिघेही पिता-पुत्र कारागृहात असून, न्यायालयाने (Court) परवानगी दिल्यानंतर प्रकाश लोंढे यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता लोंढे यांचा निवडणूक प्रचार कसा होणार आणि मतदारांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा : Nashik NMC Election : निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी; भाजपने ‘या’ माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट

उद्धव निमसेंचा मुलगाही निवडणुकीच्या रिंगणात

भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणात संशयित आरोपी असून, सध्या कारागृहात आहेत. त्यानंतर भाजपने प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद लक्षात घेऊन त्यांचे पुत्र रिद्धेश निमसे यांना उमेदवारी दिली आहे. एका गुन्ह्यात संशयित असलेल्या उद्धव निमसे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिल्याने पक्षातील जुन्या आणि निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील हे देखील पंचवटीतील गोळीबार प्रकरणात कारागृहात आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कुणालाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...