नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी ठरवली आहे. त्यानुसार कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ६५ रुपयांची ठरली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार नुकतीच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. यावेळी दर निश्चित झाले आहे. त्यात प्रचारदम्यान दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफीपासून जेवणापर्यंत तसेच पाणी, नाश्ता आणि प्रचार साहित्याच्या खर्चाचा तपशील देण्यात आला. विशेष म्हणजे प्रचारात सर्वाधिक वापर होणाऱ्या चहा व कॉफीचे दर ठरवून देण्यात आल्याने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा येणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
पाण्याची बाटली २० रुपयांना, तर २० लिटर पाण्याच्या जारसाठी ३५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. नाश्त्याच्या बाबतीत पार्लेबिस्किट ५ रुपये, वडापाव १२ रुपये, भाजी १५, पोहे २०, कचोरी १५ तर फरसाण १२ रुपये दराने मोजण्यात येणार आहे. डोसा किंवा उत्तप्पा ४० रुपये. मिसळपाव आणि पावभाजी प्रत्येकी ६५ रुपये दराने निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय प्रचारासाठी (Campaign) वापरण्यात येणार्या साहित्यामध्ये छोटी शाल ४० रुपये, मध्यम शाल ६० रुपये दराने गणली जाणार आहे. पाणी टँकरसाठी स्वतंत्र वा निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेने जाहीर केलेली ही दरयादी उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर पारदर्शकता आणणारी ठरणार असून खर्चाची नोंद तपासताना हीच दरयादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट
मांसाहारी जेवण २५० रुपये
जेवणासाठी शाकाहारी थाळीचे विविध पर्याय देण्यात आले असून साधी शाकाहारी थाळी ८० रुपये, स्वीटसह थाळी १०० रुपये, तर डिलक्स शाकाहारी थाळी १५० रुपये दराने मोजली जाईल. मांसाहारी जेवणासाठी २५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. निश्चित झालेल्या दरानुसार कट चहाचा दर ५ रुपये प्रति कप, तर फुल चहा १० रुपये प्रति कप इतका ठरवण्यात आला आहे कॉफीसाठी १२ रुपये प्रति कप, तर ताक किंवा दूध १५ रुपये प्रति कप असा दर निश्चित करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर




