Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकनाशिक मनपात तीन सदस्यीय 'इतके' तर चार सदस्यीय 'इतके' प्रभाग

नाशिक मनपात तीन सदस्यीय ‘इतके’ तर चार सदस्यीय ‘इतके’ प्रभाग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आगामी महापालिका निवडणुकीत (Nashik Municipal corporation) प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नाशिक महापालिकेला ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे….

- Advertisement -

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर तो पेन ड्राइव्हमध्ये गोपनियरीत्या सादर करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (NMC Commissioner)

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर काम करीत 30 नोव्हेंबरच्या पूर्वीच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पाठविण्याची तयारी केल्याचे समजते.

आयोगाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील नगरसेवकसंख्या १२२ वरून १३३ इतकी होणार असून, तीन सदस्यीय ४३ तर चार सदस्यीय एक अशाप्रकारे एकूण ४४ प्रभाग अस्तित्वात येणार आहेत.

कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या केएमएल फाइल (KML File), तसेच सर्व प्रभाग व त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरणपत्र असलेला पेन ड्राईव्ह सील करून राज्य निवडणूक आयोगास गोपनियरीत्या सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

तीन सदस्यीय प्रभाग पध्दत त्यामुळे नाशिक महापालिकेतील अस्तित्वात आणण्याचा निर्णय नगरसेवकसंख्या १२२ वरून राज्यातील महाविकास आघाडी ने ११ ने वाढून १३३ वर जाणार सरकारने घेतला आहे.

त्यामुळे प्रभागांच्या प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा संख्येतही वाढ होणार आराखडा तयार करण्याचे असल्याने प्रभागरचनेचा कच्चा निर्देश राज्य निवडणूक आराखडा तयार करण्याचे काम आयोगाने महापालिकेला ५ महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबरला दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या