Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik Municipal Election : नाशिकमध्ये पहिल्या दोन तासांत 'इतके' टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची...

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये पहिल्या दोन तासांत ‘इतके’ टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून शहरातील १ हजार ५६३ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. मात्र, प्रभाग क्रमांक ०२, २४ आणि २९ मध्ये सुरुवातीला ईव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळ थांबवावी लागली होती. त्यानंतर आता मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु असून, पहिल्या दोन तासांची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

शहरात सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासांत ६.५० टक्के मतदान (Voting) झाल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे. तर मालेगाव महापालिकेसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासांत ११.०९ टक्के इतके मतदान झाले आहे. दुपारनंतर या दोन्ही ठिकाणच्या मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मतदार सकाळच्या सत्रात मतदान करण्यास प्राधान्य देत असल्याचे बघायला मिळत आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात; ‘या’ प्रभागांत EVM मध्ये बिघाड झाल्याने उडाला होता गोंधळ

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.

काही प्रभागांत ईव्हीएममध्ये बिघाड

प्रभाग क्रमांक ०२ मधील आडगावच्या महापालिका शाळेतील खोली क्रमांक ९ मधील ईव्हीएम नऊ वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याने मतदानास सुरुवात झाली. तर २४ मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक ८ येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून केल्याने संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. तर प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रातील खोली क्रमांक दोनमध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे तब्बल अर्धा तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. यानंतर मशीन सुरू झाल्याने मतदान प्रक्रिया सुरु झाली.

ताज्या बातम्या