Friday, November 22, 2024
Homeनाशिक'माझी वसुंधरा' अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची...

‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची लयलूट

नाशिक जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट, चौथ्या वर्षीही राज्यात अग्रेसर

नाशिक | Nashik

राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तब्बल १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिसे जाहीर झाली आहेत. या अभियानात सलग चौथ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) राज्यस्तरीय, तसेच विभागस्तरीय बक्षिस मिळविले आहेत. जिल्ह्यात अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना, तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, एकूण तब्बल ७.५ कोटींची बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज लोकार्पण

माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण आणि वातावरणीय बदल (Environment and Climate Change) विभागाच्या अंतर्गत चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचा भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर आधारीत राबविण्यात येणारा हा पहिला कृतिशील उपक्रम आहे. त्याअंतर्गत पर्यावरणाचे जतन, संरक्षण आणि संवर्धनार्थ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा घेतली जाते. या ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले होते.

हे देखील वाचा : Nashik Niphad News : खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

तसेच स्पर्धेचेदेखील निरीक्षण ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीनिहाय बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. माझी वसुंधरा अभियान सुरु झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये (State Level Award) नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. पुढील वर्षासाठीचेही सूक्ष्म नियोजन करून व मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळवण्याचे लक्ष्य निर्धारीत केले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Senate Results: ठाकरेंच्या युवासेनेचा १० पैकी १० जागांवर विजय, आदित्य ठाकरे म्हणाले, इथूनच निवडणुकीच्या…

माझी वसुंधरा अभियानात सलग चौथ्या वर्षी जिल्ह्याला १५ पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृद्ध गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली काम करण्यात आली आहेत. भविष्यातही चांगले काम करून पर्यावरणपूरक गाव तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.

आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्ह्याला प्राप्त झालेली बक्षिसे

१) सर्वोत्तम कामगिरी राज्यस्तरीय तृतीय बक्षीस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

२) १५ हजार खालील लोकसंख्या गट – राज्यस्तरीय उत्तेजनार्थ – त्र्यंबकेश्वर नगरपालिका

३) १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या गटात राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पिंपरी सैय्यद

४) १.५ हजार ते २.५ हजार लोकसंख्या गट : राज्यस्तरीय – मोडाळे ग्रा.पं. प्रथम क्रमांक, भोकणी ग्रा.पं – तृतीय क्रमांक

५) भूमी थिमॅटीक गटात राज्यस्तरीय मोडकी ग्रामपंचायत, प्रथम

६) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात : राज्यस्तर – आवळी दुमाला – दुसरा

७) भूमी थिमॅटिक गटात: राज्यस्तर आवळी दुमाला

अ) ग्रा.पं. – प्रथम

१) २.५ ते ५ हजार लोकसंख्या गटात राज्यस्तर – ढकांबे – उत्तेजनार्थ बक्षीस
२) १.५ हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यस्तर पिंपळगाव डुकरा उत्तेजनार्थ बक्षीस.

ब) विभागस्तरीय बक्षीस

१) १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गट चांदोरी ग्रामपंचायत – द्वितीय क्रमांक
२) ५ हजार ते १० हजार लोकसंख्या गटात न्यायडोंगरी ग्रा.पं. तृतीय क्रमांक बक्षीस
३) १.५ ते २.५ लोकसंख्या गटात विभागात दरी ग्रा. पं. – प्रथम क्रमांक, गिलाणे ग्रापं द्वितीय क्रमांक
४) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात विभागात – शिरसाठे ग्रा.पं. द्वितीय क्रमांक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या