नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) धुव्वाधार बरसल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. दिंडोरी, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यांमधील ३१८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, त्यात २१७.३० हेक्टरवरील द्राक्षबागांचे (Vineyards) नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी
या अवकाळी पावसाचा फटका ४ तालुक्यांमधील ६३ गावांना बसला आहे. नुकसानग्रस्त सर्वाधिक ३६ गावे नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) असून, तेथील ४६० शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान केले आहे. दिंडोरी तालुक्यातील १९ आणि निफाड तालुक्यातील ४ गावांमधील तसेच सिन्नर तालुक्यातील ४ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. दिंडोरी तालुक्यातील १८२ आणि निफाड तालुक्यातील १९ तर सिन्नर तालुक्यांतील १४ शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे पावसाने नुकसान केले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त होणार?
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ११८.२० हेक्टरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा फटका बसला आहे, तर नाशिक तालुक्यातील ८३ हेक्टर द्राक्षबागाही त्यामुळे झोपल्या आहेत. दिंडोरीत एकूण १२०.८० हेक्टरवरील पिकांचे, तर नाशिकमध्ये एकूण १८८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. निफाड व सिन्नरमध्ये प्रत्येकी ९.५० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : एमडीला दोन हजारांचा भाव; चौघांकडे सखोल तपास
दृष्टीक्षेपातून
नुकसानग्रस्त गावे | ६३ |
नुकसानग्रस्त शेतकरी | ६७५ |
नुकसानग्रस्त बागायती क्षेत्र | १०७ हेक्टर |
नुकसानग्रस्त बहु वार्षिक पिके | २२० हेक्टर |
नुकसानग्रस्त एकूण क्षेत्र | ३२७.८० हेक्टर |
नुकसानग्रस्त तालुके | दिंडोरी, नाशिक आणि निफाड |
या पिकांचे नुकसान
द्राक्ष | २१७.३० हेक्टर |
डाळिंब | ३ हेक्टर |
भाजीपाला व इतर | ७६.८० हेक्टर |
टोमॅटो | २७ हेक्टर |
कांदा | २ हेक्टर |
कांदा रोपवाटिका | १.२० हेक्टर |