नाशिक | Nashik
नाशिकमधील (Nashik) काही भागात भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूजल पातळी कमालीची खालावली असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जिल्ह्यातील (District) तब्बल ७७६ गावांना वैयक्तिक लाभासाठी वेळ खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. यात सर्वाधिक अडचण सिन्नर व निफाड तालुक्याची झाली आहे. भूजल पातळी मोजताना मंडलाची तसेच तालुक्याची हद्द ग्रह्य न धरता पाणलोट क्षेत्राचा विचार केला जातो. नैसर्गिक डोंगर रांगांच्या आधारे व त्यांची विभागणी होते. पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वे केला जातो. सर्वे करताना कृषी विभागाने (Department of Agriculture) नोंदविलेल्या क्षेत्रनिहाय पिकांची नोंद तलाठ्यांनी नोंदवलेल्या विहिरी जलसंपदा विभागाने उभारलेले बंधारे तलाब नदी-नाल्यांची माहिती संकलित करून एकत्रित केली जाते.
त्यानुसार जिल्ह्यातील १९२३ गावे आणि १३८४ ग्रामपंचायतींचा (Gram Panchayats) समावेश आहे. प्रशासकीय सोयीसाठी काही गावांची वाड्यावर त्यांची विभागीय विभागणी महसूल मंडळात तसेच तालुक्यामध्ये केली आहे. त्यानुसार जिल्हा हा गोदावरी तापी पूर्व आणि पश्चिम बाहिनी नद्या अशा तीन खोल्यांमध्ये ८० पाणलोट क्षेत्र विभागात गेला आहे.गोदावरीत सर्वाधिक ३७ पाणलोट क्षेत्र आहेत, तापी पूर्वेला ३४ आणि पश्चिम बाहिनी नदी परिसरात ९ क्षेत्र आहेत. जिल्ह्यातील ८० प्रमुख पाणलोट क्षेत्रापैकी १२ पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक जल पुनर्भरणच्या तुलनेत अधिक वेगाने पाणी उपसले जात आहे. या पाणी उपसण्याच्या निकषावर गावनिहाय मूल्यमापन करण्यात आले.
यात जिल्ह्यातील १९४८ गावांपैकी ११७२ गावे सुरक्षित, तर ४१९ गावे धोक्याच्या पातळीच्या समीप आहेत. या गावांमध्ये ही वैयक्तिक लाभार्थीसाठी विहिरींना परवानगी नाही. केवळ दोन, तीनपेक्षा अधिक लोकांना सामाईक विहीर घेण्याची मुभा मिळेल. ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधन विहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा गावांची संख्या ३५७ असून जी १५ पाणलोट क्षेत्रात येतात. यामध्ये गोदावरी खोन्यातील नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांचा समावेश होतो. या भागात सिंचन, अन्य कारणांस्तव उच्चशक्तीच्या बीज पंपांनी अमर्याद पाणी उपसा होत आहे. यातील निफाड हे अतिसिंचित क्षेत्र असून सिन्नरचा निम्मा भाग कोरडवाहू आहे. बेसुमार पाणीउपसा झालेल्या सिन्नरमधील ७७ गावांमध्ये विहिरींवर बंदी घालण्यात आली आहे.
बेसुमार उपशाचा अभ्यास
एखाद्या भागात किती पाऊस पडला,जलसंधारणाची कामे यातून किती पाणी जमिनीत झिरपते, याचा संगणकीय आज्ञावलीतून अनुमान काढला जातो, यामध्ये परिसरातील पिकांसाठी वापरलेले पाणीही विचारात घेतले जाते. या प्रक्रियेत ७० टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपसा झाला असल्यास ते गाव सुरक्षित मानले जाते. ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपसा होणारे भाग वेगवेगळ्या गटात समाविष्ट होतात, ९० ते १०० टक्के आणि १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपसा होणारा भाग धोकादायक व धोकादायक पातळीच्या समीप मानले जातो.