Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

बारामती |

- Advertisement -

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी
उत्तम दिघे यांनी दिली.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून, त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ईव्हीएम
मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहायक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याकडून मतमोजणी करिता नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसरीकडे राज्यातील जनतेचे लक्ष हे राहुरी पोटनिवडणुकीकडेही असणार आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक पार पडली. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एपीके फाईल ठरतेय सायबर हत्यार; दाेघांचे माेबाईल,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik डिजिटल अरेस्ट, फॉरेक्स ट्रेडिंग, बिटक्वाइन आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) आता आपले लक्ष्य...