इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या तेवीस वर्षीय युवकाचा (Youth) गळ्यात मांजा अडकून गळा चिरल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना इंदिरानगर पोलिस (Indiranagar Police) हद्दीत घडली आहे. सोनू धोत्रे (वय २३) असे मृत्यू झालेल्या युवकाचे (Youth) नाव असून तो गुजरातमधील वलसाड येथून संक्रांतीसाठी नाशिकमध्ये आला होता. त्याचे चार महिन्यांनी लग्न होते. मात्र, त्याआधीच नायलॉन मांजामुळे धोत्रे यांचा मृत्यू झाला.
सोनु धोत्रे लहान असतानाच वडिलांचे निधन झाले होते. त्याला एक मोठा भाऊ, बहीण आणि आई असून भाऊ नाशिकमध्ये नोकरीला आहे. सोनु धोत्रे गुजरातच्या (Gujarat) वलसाडमध्ये महापालिकेच्या गाडीवर चालक म्हणून कामावर आहे. संक्रांतीच्या सुट्टीसाठी तो गुजरातवरून नाशिकमध्ये (Nashik) भावाकडे आला होता.सोनू धोत्रे २० मे रोजी विवाहबंधनात अडकणार होता. मात्र, आज साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक जी.जे.१५ डी.एस.८३४१ या क्रमांकाच्या गाडीहून पाथर्डीगावं ते देवळाली कॅम्प या रस्त्याने पाथर्डी गावाच्या चौफुली ओलांडून जात असतांना पतंगाचा मांजा गाळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला. यावेळी अधीक रक्तश्राव होत असल्याचे बघून काही नागरिक त्यास उपचारासाठी तात्काळ एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले.
हे देखील वाचा : Nashik News : नायलॉन मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू
यावेळी कर्तव्यावर असणारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे (Indiranagar Police Station) गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देत पुढील हालचालीना वेग दिला. मात्र,अधिक रक्तश्राव झाला असल्याने व मांजामुळे खोलवर गळा चिरला गेला असल्याने खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. तसेच सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. याबाबत इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.