
नाशिक : प्रतिनिधी
चांदशी (Chandshi Road) रोडवरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या (Road Work) ठिकाणी बॅरिकेडिंग आणि सूचना फलक तोडून कार आत (Car Accident) घुसल्याची घटना समोर आली आहे. हा रस्ता नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) नव्हे, तर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NHAI) हद्दीत असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी स्पष्ट केले आहे.
चांदशी रोडवर रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्यात आले होते. तसेच वाहनचालकांना सूचना देण्यासाठी साईनेजही लावण्यात आले होते. मात्र, संबंधित कारचालकाने बॅरिकेड तोडून विरुद्ध दिशेने वाहन नेल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
Nashik News : रामकुंड परिसरात पाच पर्यटक बुडाले; एकाची प्रकृती गंभीर
घटनेच्या पार्श्वभूमीवर केवळ रस्ते कामातील सुरक्षेची तपासणी न करता वाहनचालक योग्य स्थितीत वाहन चालवत होता का, याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे आयुक्त खत्री यांनी म्हटले आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण शोधताना रस्ते कामाची सुरक्षितता, बॅरिकेडिंग तसेच चालकाची स्थिती या सर्व बाबी तपासल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी वाहनचालकांनी सूचना फलक आणि बॅरिकेडिंगकडे दुर्लक्ष करू नये, तसेच सुरक्षितपणे वाहन चालवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




