चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
तालुक्यातील कोलटेक-पाटे येथील भूमिपुत्र किशोर अंबादास ठोके (३०) या जवानाचे हृदयविकाराने (Heart Attack) निधन (Death) झाले. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे ५६ मध्ये किशोर सेवा बजावत होते. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
किशोर ठोके यांचा दुसरा भाऊ तुषार हेही सैन्यात (Army) दाखल असून जम्मू-काश्मीरमध्येच कार्यरत आहेत. तिसरा भाऊ सागर ठोके शेती करतो. कुटुंबातील दोन कर्ते पुरुष सैन्यात दाखल असल्यामुळे या कुटुंबाची ओळख सेवा आणि शौर्याशी जोडलेली आहे.
किशोर ठोके यांचा दोन वर्षापूर्वी विवाह (Marriage) झाला होता. त्यांच्या पत्नी दिघवद (तालुका चांदवड) येथील असून सध्या बाळंतपणासाठी माहेरी आहेत. १७ डिसेंबर रोजी प्रसूतीची संभाव्यता डॉक्टरांनी दिली आहे. या कारणामुळेच शहीद किशोर काही दिवसांत सुट्टीवर मूळ गावी येणार होते. परंतु, त्याआधीच नियतीने घाव घातल्याने ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.




