Friday, September 25, 2026
HomeनाशिकNashik News : मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

Nashik News : मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

जुने नाशिक | Old Nashik

प्रभाग क्रमांक १४ मधील सारडा सर्कल ते चौक मंडईकडे जाणाऱ्या इमामशहा मार्गावर आज (शनिवारी) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास एक भलेमोठे जुने झाड (Tree) मुख्य रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. हे झाड जहांगीर कब्रस्तान परिसरातील असून, ऐन वर्दळीच्या रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इमामशहा मार्ग (Imamshah Marg) हा परिसरातील प्रमुख आणि वर्दळीचा रस्ता मानला जातो. आज (शनिवारी) अचानक येथील कब्रस्तानच्या आवारातील एक जुने आणि जीर्ण झालेले झाड उन्मळून थेट मुख्य रस्त्यावर आले. झाड कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. सुदैवाने झाड कोसळले त्या क्षणी रस्त्यावरून कोणतेही वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठा अनर्थ टळला.

स्थानिक नागरिकांची तत्परता

झाड कोसळल्याची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी (Citizen) तातडीने नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या कापून आणि लाकूड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची मागणी

पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर, जुने नाशिक परिसरातील अनेक भागांत अशीच जीर्ण आणि धोकादायक झाडे उभी आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळ्यापूर्वीच अशा वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची छाटणी करणे गरजेचे होते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने तातडीने शहरातील सर्व धोकादायक व जीर्ण वृक्षांची पाहणी करून त्यांची छाटणी करावी, अशी जोरदार मागणी आता जुने नाशिकमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...